लागीर १२५ वाचा गेल्यावाणी झालं मला. सुला रडत हुती. किती वेळ गेला काइ कळलं नाय. डोस्कं सुन्न झालं हुतं. इरागतीला भाईर जाऊन आल्ये मी. सुला कसल्याशा गोळचा खात हुती. म्हणलं, 'कसल्या ग गोळंचा?' तर म्हणली, 'डोक्यावरच्या. ( , मग हातरुणावर आली. माझ्या कुशीत तोड खुपसलं. तिच्या जीवाच्या कळा तिचं अंग गदगदून बाहेर पडत हुत्या. माझ्याबी डोळ्या- चं झरं झालं. तोंडात बोळा देऊन पेटवून द्यावं तशी तिची त्या भाड्यानं गत केली हुती. तिच्या सुखासाठी जीव द्यालाबी मी तयार हाय. ती माझ्या काळजाचा तुकडा हाय. जीवच जडलाय माझा तिच्यावर जीव जडणं वाईट. कशाचीच पर्वा वाटत नाय. सुलाम्होरं मला दुनियाबी कवडीमोलाची. त्यो भाड्या दिसला तर पायताणानं हाणीन मी. रातभर मन सैरभैर झालं हुतं. सुला लगोलग झोपली. माझा झुंझुर्काचा डोळा लागला. सकाळी जागी झाले. सुला झोपल्याली हुती. माझ्या हातावरच डोस्कं ठेवलं हुतं. हात काढून घेताना आपटलंच तिचं डोस्कं. तरी जागी झाली नाय. तिचा चेरा नीट दिसत नव्हता. नजर कमी आली हुती माझी. मला का बुद्धी झाली कुणाला ठावं. चुलीवरची चिमणी आनून तिला मी बघितलं नि काळीज फाटलं माझं. रातचा कधी जीव गेला हुता काय की. तिला मांडीवर घेऊन हांबरडा फोडला मी. माणसं जमली हुती. डाक्तरनं सुलाला तपासलं. झोपेच्या गोळ्या खाऊन तिनं सोत्ताचा घात केला हुता. तिचा वसंतावर जीव जडला हुता. मीबी माझं सारं आयुस्य तिला वाह्यलं हुतं. तिला धोका दिला नव्हता. तरीबी तिला माझं काइच कसं वाटलं नाय? वांझंची माया नि वाझंचं कष्ट वांझच असतात का? जित्ती आसती तर इचारलं तरी आसतं की, 7 तुमी तरणीताटी पोरं वांझ पीर्तीसाठी आशी वांझ मरणं का J भोगता ? ('नारायण आतीवाडकर' पारितोषिक विजेती कथा बेळगाव १९८७ )
पान:लागीर.pdf/१३२
Appearance