Jump to content

पान:लागीर.pdf/१२३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

लागीर ११६ च्या गळयाशी आणणारी ढालगज भवानी हाय. आमी तिला शॅप नांद- विणार नाय. घिऊन जा आपल्या लाडक्या लेकीला हिच्या भन बिन कामाचं झंगाट केलंया नि तू मला भ्या दावतीयास. 'आता झंगाट कुणी केलं? तू का मी? तूच तर म्हणलास हिस- का दावतो म्हणून 'बरं ते कायबी असू दे. कसं बी बोलू दे. आपल्या आंगी लागून घ्याचं नाय. संमदा दोष तिच्यावर टाका चा. तिच्या नवऱ्याला मी सांगतोच पण आई, तिच्या पोटच्याचं काय हुणार नाय नव्हं? 'त्योच तर फास बसत्यावाणी झालंय काय करायचं देवा तरी मी तुला सांगत हुते. वाई आवघाडली-सवघाडली हाय मार- ... ताना जपून मार. 'तिच्या आयची बिलामत तिच्या ऽऽ शेवटाला संमदी मलाच फासावर चढवून डोळं गाळणारं आसं दिसतंय. 215 डोस्क्यात राख नको घालूस एक इगत हाय बघ. कराडला जा. चांगला डाक्तर घरी आण. झालं बेस झालं. नायतर डाक्तरला पैसे दिऊन गप करु. तर 'त्ये झालं ग, पर साऱ्या गावाच्या डोळयावर माझा धंदा आलाय. काही जणांणी वक्कळ पैसा दिऊनबी गुण आला नाय. ती माणसं दात खाऊन हाइत. कालचा दंगा सान्या गावाला ठावं झालाय. म्हणलं ह्याचा गावावर वचक बसलं; पण आता काय कमी जास्त झालं तर साऱ्या गावाचं त्वांड कसं गप करणार? ( आता का? 'तूच शिकवलीस ती इद्या! माझी कसली आलीया दुसरी इद्या. माझं डोस्कं तू आणखीं खवळू नगस. तेवढ्यात मधली धावत आली. घावऱ्या घावऱ्या म्हणाली, आत्याबाई, चला, चला. धाकटी डोळं पांढरं करतीया. कस- नुसं कराया लागलीया. चला. 2 ते ऐकून आल्यावाई गळा काढून गडगडा लोळू लागल्या. म्हणू ( ते काय सांगू? तुझी इद्या काय मला कळत हुती