लागीर ९४ ( तू ट्रेन झालास, मी मेलो तरी तू उपाशी मरणार न्हाईस. ' शंकया, तुला तुझ्या आईची सय येती? ' व्हय, ती हुती तवा मी शाळेत जात हुतो. आता सातवीत आसतो बघ. भट्टीचं काम, गि-हाईकं बघता बघता जीव कावून जातो. अशा वक्ताला आईची लई सय येती बघ. रडू येत मला. वाटतं आप- ल्या मनात पेटल्याला वणवा कुणाला तरी सांगावा.. 'तू दादास्नी का सांगत न्हाइस ? ' पयलं, पयलं सांगायचो. थोडं थोडं जमलं तसं; पण त्यांनी मला समजावलं. आई हुती तवा दोघं रोजगार करीत हुती. मी शाळत हुतो. काय काळजी नव्हती. आई मरुन गेली. दादाच्या काळजा- ला पलिदा लागला. मला सोडून त्ये कुठ्ठ जाईनासं झालं. मला पोटाशी धरुन त्ये रातभर रडायचं. कधी कधी पिऊन याचं. पोटाचं हाल झालं तवा घरातच भट्टी सुरु केली. आता आमचं पोट तरी भरतंय. पण लोकं नावं ठेवत्याती. दारुड्याच्या बायका शिव्या देत्यात.' त्याला इलाजच नाय. 'थू: कसली घाण घाण तुमाला कसं रं काय वाटत नाय? ' • --- शिवराळ माणसं तुमच्याकडं येत्यात. ( ' पुन्ना पुन्ना तसं का म्हणतीस ग? मला राग येतो. ' ती दोघं शंकयाच्या दारात आली. चार खणाच्या त्या घराला कुलूप होतं शंकया खोडकर नजरेनं शांतीकडं बघून हसत होता. का रं फसिवलंस? कुलूप हुतं तर घुलवून घुलवून मला हित- पत्तूर का आणलंस? " ( 'गंमत दाखवायला. 'खोटारडा - 'थांब, इथंच. बघ तरी त्यानं दाराची एक फळी नेटानं उचलून सरकवली आणि त्या फटीतून तो आत गेला. शांती अचंब्यानं बघत राहिली.
- हाय का नाय गंमत?
आत ये की. ' ( नाय बाबा. भ्या वाटतंय मला.