पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/90

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसला. होय, हाच पाण्याचा टॅकर आहे! ट्रकवर पाण्याची टाकी फिट करून त्याचा टॅकर म्हणून उपयोग खातं करीत होतं.
 आता दहा मिनिटात टॅकर तांड्यावर येईल आणि मग आपण रांजणभर पाणी भरून घेऊ... वहिनीचं सारं अंग थंड पाण्यानं पुसून काढू म्हणजे तिचा ताप झटकन उतरेल आणि ती सुखरूप बाळंत होईल व नव्या बाळाला आंघोळ घालून स्वच्छ करता येईल.
 प्रज्ञा एकटक खालून वर तांड्यावर येणा-या ट्रककडे पाहात होती. एक एक क्षण तिला प्रदीर्घ वाटत होता.
 आणि तो ट्रक वर येईचना. प्रज्ञानं डोळे चोळून पुन्हा पाहिलं. तो वाटेतच रस्त्यावर थांबला होता.
 "तो ट्रक बिघडला की काय?" हा प्रश्न तिच्या मनात चमकला आणि तिच्या पोटात पुन्हा एकदा भीतीचा गोळा आला.
 आणि ती बेभान होऊन, पायात चपला नाहीत हे विसरून तशीच वेगानं धावत खाली जाऊ लागली. आणि दोन मिनिटात धापा टाकीत, ठेचा खात, अडखळत जेव्हा ती ट्रकजवळ आली, तेव्हा तिथं ट्रकला टेकून इब्राहिम शांतपणे विडी फुकीत धूर काढीत उभा होता.
 “मेरी जान, परेशान लगती हो! क्यात बात है? लोचटपणे इब्राहिम तिचा उभार बांधा आसक्त नजरेनं न्याहाळात म्हणाला.
 जेव्हा जेव्हा इब्राहिम विखारी नजरेनं प्रज्ञाला पाहायचा, तेव्हा तिला वाटायचं, तो नजरेनंच आपल्याला विवस्त्र करून उपभोग घेतोय. तिच्या मणक्यात एक थंड असह्य स्त्रीत्वाची भीती चमकून जायची, पण तिला फारसा विरोधही करता येत नसे. कारण त्यानं अनेकदा गर्भित धमकी दिली होती,
 "प्यारी, इस तांडे पे ट्रक - टॅकर लाना बडी जोखीम भरी बात है. दुसरा कोई ड्रायवर यहाँ नही आता. सिर्फ मैं आता हूँ तो तुम्हारे लिए, तुम पे दिल जो आ गया.”
 जेव्हा संधी मिळेल तेव्हा तिच्याशी तो लगट करायचा. प्रज्ञाला त्याच्या विषयांध स्पर्शाची घृणा - किळस वाटायची, तरी सुद्धा त्याला झिडकारता पण येत नसे. त्याची माफक लगट तिला कौशल्याने - तारेवरची कसरत करीत अंतर राखीत सहन करावी लागायची.
 पळत आल्यामुळे प्रज्ञाला धाप लागली होती व तिची उभार छाती वर - खाली होत होती. त्याकडे एकटक इब्राहिम पाहात होता. ते जेव्हा तिच्या ध्यानी आलं, तेव्हा ती शहारली व छातीवर हात घेत तिनं विचारलं,
 "काय झालं ड्रायव्हर साहेब? टॅकर बंद पडला का?"

 वैसाच बोलना पडेगा... रेडिएटर में फॉल्ट है... पाणी ठहरताच नहीं. इंजन

९० ॥ लक्षदीप