पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/91

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

इस वजह से गरम हो गया है. फटने का डर है." इब्राहिम जे सांगत होता, त्याचा तिला अर्थ बोध होत नव्हता. पण एवढं कळत होतं, की टॅकर बंद पडला होता.
 “पाण्याची लई जरुरी आहे, ड्रायव्हरसाहेब, माझी वहिनी बाळंत होतेय, तिला ताप चढलाय. प्लीज, काहीतरी करा व ट्रक वर आणा ना. माझ्यासाठी." कळवळून प्रज्ञा म्हणाली.
 "तरे लिए जान भी हाजिर है." इब्राहिम नाटकी ढंगात म्हणाला, “लेकिन थोडा ठहरना पडेगा. इंजन ठंडा होने दो... अभी मैने रेडिएटर में पाणी भरा है... कुछ समय रुकना पड़ेगा....."
 तिनं सुटकेचा एक नि:श्वास टाकला. “म्हणजे ट्रक फारसा बिघडलेला नाही. वर येऊ शकेल...!"
 "तब तक क्या ऐसे ही धूप में खड़ी रहोगी? नहीं प्यारी, तुम मुरझा जाओगी." इब्राहिमचं हे लागट बोलणं तिला सहन होण्याच्या पलीकडे होतं. पण चूप बसणं ही या क्षणी तिची मजबुरी होती, असहायता होती.
 “मला..... मला सवय आहे, ड्रायव्हरसाहेव त्याची."
 लेकिन मुझसे देखा नहीं जाता. चलो, ट्रक में बैठते है. त्याच्या सूचक वालण्यानं प्रज्ञाचं स्त्रीत्व नखशिखान्त थरकापलं. त्याला नाही म्हणणं म्हणजे आपल्या हातानं पायावर धोंडा पाडून घेण्यासारखं होतं. न जाणो, तो ट्रक घेऊन वर येत नाही म्हणाला तर... तिच्या नजरेसमोर तळमळणारी व प्रसूति वेदना सहन करणारी रमावहिनी आली, तिचं तप्त पोळणारं शरीर आठवलं आणि सोजरमावशीचे शब्द - "पारी, दोन बादल्या पानी हवं. काय बी कर, लय गरज हाय तेची... ह्या रमेचा ताप वाढतुया. तो कमी करण्यासाठी पानी हवं... नाय तर मला इपरीत व्हण्याची भीती वाटते."
 ड्रायव्हरनं तिला हात देऊन टकच्या केबिनमध्ये खेचलं. त्यावेळी कौशल्यानं एक झटका दिला व हात सोडला, तशी बेसावध प्रज्ञा त्याच्या अंगावर कोसळली. त्यानं संधी सोडली नाही व तिला गच्च मिठी मारली.
 बरहीमच्या हिमच्या कित्येक दिवस आंघोळ नसलेल्या, घामेजलेल्या, वास मारणाच्या " ५५ प्रज्ञाच्या अंगांगावर किळस पेरून गेला. ती आक्रसली गेली व म्हणाली, साहब, हे... हे बरं नाही. प्लीज, मी फार परेशान आहे. माझी वहिनी तिकडे तडफडतेय, प्लीज. लवकर गाड़ी सुरू करून पहा.”
 "ठीक है मेरी जान, मैं कोशिश करता हूं."
 न तिच्यापासून अलग होत म्हटलं आणि स्टिअरिंग हाती घेऊन चावी

आरभ केला. ट्रक नुसताच दोन - तीनदा गुरगुरला व थांबला, “नहीं प्यारी, अभी इंजन गरम है, ठहरना पडेगा....

लक्षदीप ॥ ९१