पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/405

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

लागलो, तेव्हा त्यानं स्पष्टपणे सांगितलं.
 ‘हम आझाद काश्मीर चाहते है, न हमें पाकिस्तानसे लेना देना है; न तुम्हारे हिंदुस्थानसे.'
 आपण सारे भारतीय काश्मीर हा भारताचा अविभाज्य भाग मानतो. कारण हा प्रदेश कश्यप ऋषीनं वसवला आहे ही आपली श्रद्धा आहे. कल्हणच्या ‘राजतरंगिणी ग्रंथात प्राचीन काश्मीरचा समृद्ध इतिहास कथन केला आहे. हिंदू व बौद्ध धर्माची प्रभाव इथं जाणवतो. पण नंतर इथं इस्लाम आला, इतरत्र तो तलवारीच्या बळावर रुजला, इथे मात्र सूफी मुस्लीम संतांनी प्रेमानं मनपरिवर्तन करून एतद्देशीयांना इस्लाम धर्म स्वीकारायला प्रवृत्त केलं. पण भारताच्या फाळणीनंतर काश्मीर हा फाळणीचा अनिर्णित प्रश्न मानून व त्यावर आपला पूर्ण हक्क आहे असं समजून पाकिस्ताननं जी पद्धतशीरपणे - खास करून जनरल झियीच्या काळापासून विशेषत्वाने वाटचाल केली, त्यामुळे ‘आझादी' चा तथाकथित लढा इस्लामच्या रंगात नहात सुरू झाला.आमच्या ड्रायव्हरचे हे स्पष्ट उद्गार त्याची प्रचिती देत होते.
 दाल लेकच्या प्रवेशद्वारी त्यानं गाडी थांबवली, तेव्हा मी म्हणालो, 'अरे भाई, भूल गये क्या? हमे हजरतबल मस्जिद जाना है, चलो.' तसा त्याचा चेहरा खुललेला मी त्याच्या नकळत डिंपली. कदाचित फार कमी प्रवासी - त्यात बहुसंख्य हिंदूच इथे जात असणार, मुस्लिमांचं हे गाढ श्रद्धा असलेलं उपासनास्थल आहे. ते मला पाहायचं होतं!
 दाल लेकच्या पश्चिमेला व नूरजहानं रसिकतेनं निर्माण केलेल्या निशात बागेच्या समोर हजरतबल मस्जिद मोठ्या दिमाखात उभी होती. इस्लामी वास्तुशास्त्राची खुण सांगणारे डेरेदार घुमट आणि आकाशाचा वेध घेणाच्या मनोच्यांनी ही मस्जिद परिपूर्ण होती. सभोवतालची साधी पण नीटपणे जोपासलेली बाग, चिनार - देवदारची उंच वाढलेली झाडे, सुखद गारवा आणि पवित्र नीरव शांतता यानं परिसरामध्ये श्रद्धेचं रोपण झालं होतं!

 हजरतबल मशिदीचं मुस्लिमांसाठी फार महत्त्व आहे; कारण इथं इस्लामचे धर्मसंस्थापक प्रेषित महंमद पैगंबरांचा पवित्र केस - मोई-ई-मुकद्दस - जतन करून ठेवलेला आहे. मला गतवर्षी श्रीलंकेत गेलो असताना कैंडीला पाहिलेल्या बुद्धाच्या दंत मंदिराची आठवण झाली. धर्मसंस्थापकाच्या खुणा पूजनीय वाटण्याची ही वृत्ती खास आशियाई आहे. १६९९ मध्ये हा पवित्र केस इथं ठेवण्यात आला, असा इतिहास आहे. विशेष सांगण्याजोगी गोष्ट म्हणजे सध्याचे मशिदीचं संगमरवरी बांधकाम मुस्लीम औकाफ ट्रस्टच्या वतीने १९६८ ते १९७९ दरम्यान शेर ए - काश्मीर शेख अब्दुल्ला यांच्या पुढाकारानं व सक्रिय सहभागानं झालं. ही माहिती मला ड्रायव्हरनं : दिली. तेव्हा मला १९७४ साली नांदेडला यशवंत महाविद्यालयातं मी शिकत

४०४ ■ लक्षदीप