पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/377

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पोकळपणा दाखवून देत म्हणतो, "Sometime I feel they have no idea what people in the village want. In many ways the civil Service is still a relic of the (British) raj."
 पण काही वरिष्ठ व सेवानिवृत्त सनदी अधिका-यांच्या मते नागरी सेवेची गुणवत्ता दिवसेंदिवस घसरत आहे. कारण आरक्षणामुळे दुय्यम दर्जाचे अधिकारी सेवेत बहुसंख्येने येत आहोत. अर्थात अशा आक्षेपाकडे फारशा गंभीरपणे पाहण्याची गरज नाही. कारण ही वर्णदर्पयुक्त उच्चवर्णीयांची, अहंकाराला ठेच पोहोचल्यामुळे उमटणारी टिपिकल वैफल्यग्रस्त प्रतिक्रिया आहे. भारत हा केवळ उच्चवर्णीयांचा देश नाही, तर तो अठरापगड जातींचा व बहुधार्मिक, बहुभाषिक व बहुसंस्कृतींचा देश आहे. त्यांचे योग्य प्रतिबिंब प्रशासनात नसेल तर ते नागरिकांना न्याय देऊ शकणार नाही. आज प्रशासनाचे बदलते रूप म्हणूनच स्वागतार्ह आहे, पण एक आक्षेप विचारासाठी प्रवृत्त करणारा आहे. तो म्हणजे भारतीय प्रशासनात मोठा वर्ग हा उत्तर प्रदेश, बिहारचा व हिंदी भाषिकांचा आहे, कारण येथे खाजगी क्षेत्रात चांगल्या नोक-यांचे प्रमाण अत्यल्प आहे, पण आपले परंपरागत जमीनदारी, मध्ययुगीन सरंजामी संस्कार घेऊन येणारे प्रतिगामी प्रकृतीचे हे युवक आहेत. ते मोठ्या प्रमाणावर जातीय, धर्माध, पुरुषी मनोवृत्तीचे आहेत. ते केवळ सत्ता व पैशाच्या मागे असतात. हे माझे विधान नाही, तर मसुरीच्या लालबहादूर अकादमीमध्ये शिकवणाच्या वरिष्ठ सनदी अधिका-यंचे निरीक्षण आहे. ते मला बरचेसे सत्य व चिंतनीय वाटते. यामुळे चांगल्या बदलणाच्या भारतीय प्रशासनाला वेगळे अनिष्ट वळण काही प्रमाणात लागणार तर नाही ना? हा खरा चिंतेचा प्रश्न आहे.
 पण या नव्या प्रशासकांना सार्थ असा नवा रोल शोधून काढायचा आहे. तो बदलत्या परिस्थितीत क्रमप्राप्त झाला आहे. तो केवळ त्यांचा प्रश्न नाही तर शासनाचा आहे. कारण १९९० नंतर झालेल्या दोन प्रमुख बदलांमुळे हे निश्चित करणे गरजेचे झाले आहे.
 हे दोन बदल असे नमूद करता येतील.
 1. The irreversibility of reforms and the fact that Government now broadly needs to confine itself to the social sector, leaving rest to the market force.
 2. Decentralization of the advent of a strong panchayati Raj System that at local level takes away a lot of responsibilities earlier Vested with the bureaucracy.

 या प्रशासनातील दोन आमूलाग्र बदलांमुळे प्रशासकांचा ‘मायबाप' सरकारचा रोल जवळपास संपुष्टात आला आहे. त्यामुळे ‘पांढरी (अॅम्बेसिडर) कार व लाल दिवा

लक्षदीप ■ ३७७