पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/376

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

वडिलांच्या प्रवासाएवढाच खडतर, आज तो आय. ए. एस. झाला आहे, त्यामागे एक वैयक्तिक प्रेरणा होती. वडिलांचा पाय जखमी झाला असता वैद्यकीय उपचारासाठी पैसे नसल्यामुळे जखम चिघळत होती. नारायणराला आता साच्या वैद्यकीय सुविधा विनासायास घरबसल्या कलेक्टर म्हणून मिळतील. आता बापाचे म्हातारपण निवांत, सुखात जाईल. हा उमदा तरुण नियुक्तीने उद्या जेव्हा वैद्यकीय किंवा आरोग्य विभागात सचिव-उपसचिव म्हणून जाईल, तेव्हा तो नक्कीच वैद्यकीय सेवा ही गरिबांना परवडणाच्या दरात उपलब्ध व्हावी यासाठी प्रयत्न करील. तसेच वैद्यकीय विम्याच्या योजनांची अधिक उत्परतेने अंमलबजावणी करेल.
 आज आर्थिक उदारीकरण आणि शासनाच्या बदलत्या धोरणामुळे पूर्वीची,प्रशासन म्हणजे ‘मायबाप' सरकार ही प्रतिमा व भूमिका आमूलाग्र बदलली आहे. माहितीचा अधिकार, राष्ट्रीय ग्रामीण रोजगार हमी योजना, शिक्षणाचा कायदा, भारत निर्माण, राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान, सर्वशिक्षण अभियान, बचत गटाची चळवळ असे अनेक उपक्रम आम आदमीच्या विकासासाठी सुरू झाले आहेत. त्यांच्या अंमलबजावणीची अंतिम जबाबदारी ही ब्यूरॉक्रसीवर, विशेषतः आय. ए. एस. वर - आहे. एक प्रकारे हे राष्ट्र निर्माणाचे काम आहे - अत्यंत आव्हानदायी व क्षमतेची कसोटी पाहणारे काम आहे. ते स्वीकारण्यासाठी ग्रामीण तरुण जिद्दीने पुढे येत आहेत.प्रसंगी त्यासाठी खाजगी लठ्ठ पगाराची नोकरी लाथाडत आहेत. यंदा चोविसावा आलेला अनुराग तिवारी हा उत्तर प्रदेशचा तरुण म्हणतो, “ह्य देश ख-या अर्थाने आय. ए. एस. मंडळी चालवतात. सिस्टिमच्या कमतरतेबाबत दूर अंतरावरून निष्फल टीका न करता त्यात सामील होऊन ती सुधारणे खरे आव्हानात्मक काम आहे. मी त्यासाठी इन्फोसिसच्या नोकरीवर पाणी सोडले.” यंदाच्या परीक्षेत चमकलेली शायनामोल ए.ही यशस्वी तरुणी म्हणते,
 "There is a rare charm to this (I.A.S. and allied services) job.There arejobs that pay more, but the satisfaction that one gets from being a part of the system which serves the people is peerless. The opportunity to interact with people and coming face to face with their problem is the primary attraction of the civill services."

 सध्या मसुरीत प्रशिक्षण घेत असलेला कृपाशंकर यादव हा आपली ग्रामीण मुळे विसरत नाही. तसेच त्याचा प्रभावही दाखवून देत असतो. प्रशिक्षणात त्याला व इतर हिंदी भाषिकांना हिंदीमध्ये नोटस् मिळाव्यात म्हणून प्रयत्नशील असतो. प्रादेशिक भाषेत पेपर व मुलाखत देऊन येणा-यांचे इंग्रजी सुधारावे म्हणून अशी प्रोबेशनर्ससाठी मसुरीमध्ये इंग्रजी भाषेचे व संभाषणाचे वर्ग सुरू करावेत यासाठीही आवाज उठवतो.तो अॅकॅडमीच्या वरिष्ठ आय. ए. एस. अधिका-यांच्या ग्रामीण विकासाच्या आकलनातील

३७६ ■ लक्षदीप