पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/371

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

७. भारतीय प्रशासनाचे बदलते रूप!

 पूनम मलिक आणि मोनिका दहिया. दोघींचे छायाचित्र पाहिले तर त्या टिपिकल हरियानवी बहू वाटतात, जाट प्रदेशाच्या असल्यामुळे त्यांचा डोक्यावरचा पदर ढळत नाही. दोघीही मोठ्या परंपरागत घरात वावरतात. विवाहित आणि सरंजामशाही व सगोत्र विवाहाची बंदी असलेल्या खाप जमातीच्या वर्गातल्या त्या आहेत.
 पण आज दोघीही प्रकाशझोतात आहेत, कारण दोघीही २०१० च्या केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षा उत्तीर्ण झाल्या आहेत, लवकरच त्या मसुरीला प्रशिक्षणासाठी जातील.
 पूनम मलिक ही सोनपतची. सरकारी शाळेत शिकलेली आणि दूरशिक्षणाद्वारे एम. कॉम. झालेली. लग्नापूर्वीपासूनची तिची आय.ए.एस. व्हायची इच्छा. लग्नानंतर घरसंसार व हरियानवी कुटुंबमर्यादा सांभाळून तिस-या प्रयत्नात ती यशस्वी झाली.
 मोनिका दहियाच्या इच्छेसाठी सोनपतहून तिचा नवरा तिच्यासह दिल्लीत आला. ती चौथ्या प्रयत्नात उत्तीर्ण झाली, पण हा चार वर्षांचा प्रवास जिद्द व स्वप्नासह तिन संघर्ष करीत पीर केला आणि यशश्री खेचून आणली.
 हे दुसरे एका शिपांयाच्या मुलीचे - संदीप कौरचे उदाहरण घ्या. पंजाब राज्यामधील मोरिंडासारख्या मागास भागातून आलेली संदीप कौर. टीव्ही सीरियल ‘उडान' पाहून (किरण बेदीच्या जीवनावरून प्रेरित झालेली दूरदर्शनची ही एक क्लासिक मालिका होती.) तिनेही आय.पी.एस. व्हायचे ठरवले आणि आज तो अखिल भारतीय कंगमध्ये १३८ वी आली आहे व तिला तिच्या मनासारखा आय.पी.एस. विभाग मिळणार आहे. अनुसूचित जातीची व मागास भागातील एका चतुर्थ श्रेणी कर्मचा-याची कन्या. तिला वडिलांनी कर्ज काढून शिकवले व तिनेही त्याचे चीज केले!

 आता आपण आपल्या महाराष्ट्राकडे वळ या. कोल्हापर जिल्ह्यातील राधानगरीमधील शेळेवाडीचा कृष्णात पाटील हा कोरडवाहू अल्पभूधारक शेतक-यांचा मुलगाही यु.पी.एस.सी.मध्ये उत्तीर्ण झालाय. महाबळेश्वरची राजलक्ष्मी कदम हे असेच लखलखते

लक्षदीप ।■ ३७१