पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/35

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१. जोकर

 टुपीजवर काम करणा-या लीनाने सर्कसच्या त्या विशाल तंबूत आपल्या मैत्रिणीसह प्रवेश केल्यावर जेव्हा तिची नजर छोटूवर पडली,तेव्हा तिनं मानेला नापसंतीदर्शक झटका दिला आणि तीव्र तिटकाच्याचा कटाक्ष त्याच्यावर टाकला.आणि त्या क्षणी छोटूला जाणवलं की,सर्कसमधील तीन घंट्याच्या खेळापलीकडे तो कुणाच्याही जमेस नाही.तो सर्वत्र ‘अनवाँटेड' आहे.तो फक्त वेंगू - बुटका जोकर आहे,ज्याच्याकडे पाहून प्रेक्षक मनमुराद हसतात! बस्!
 तंबूच्या मध्यभागी जेथे खेळ चालतात,तिथे एरिना सर्कसमधील सर्व कलाकार व कर्मचारी जमा झाले होते.तेथेच सर्कसचे मालक वेंकटस्वामी कोचामध्ये आरामात बसले होते.समोर एका टेबलवर टी. व्ही. सेट आणि व्ही. सी. आर. ठेवला होता.सकसचा एक कर्मचारी राजन व्ही. सी. आर. लावायची खटपट करीत होता.
 आज सर्वांना राज कपूरचा ‘मेरा नाम जोकर' हा सिनेमा वेंकटस्वामी दाखवणार होते.
 आज सर्कसला सुट्टी होती!
 वेंकटस्वामी राज कपूरचे जबरदस्त फैन होते.त्याच्या निधनानिमित्त सर्कसचे खळ त्यांनी तोटा सोसून बंद ठेवले होते.तसे स्थानिक वृत्तपत्रात जाहिरातीद्वारे सिद्धही केले होते.कारण त्यांच्या सर्कसचा राज कपूरशी ऋणानुबंध होता.राजनं त्याचा 'जोकर' काढताना प्रामुख्याने जरी रशियन सर्कस वापरली होती,तरी काही १२यामध्ये एरिना सर्कसचाही त्याने उपयोग केला होता.त्यातही प्रामुख्यानं काही हास्य असगासाठी राजनं छोटला घेतलं होतं.अर्थात चित्रपटाची लांबी वाढल्यामुळे या गावर कात्री चालवली गेली होती.परंतु या प्रसंगामुळे वंकटस्वामी आणि छोटू चहा त्या महान कलाकारांच्या जवळ गेले होते. विशेषत: राजला छोटू फार आवडला होता.त्याची सर्कशीमधील विदूषकी आवडली होती.

 वकटस्वामीनी म्हणूनच आज सर्कसला सुट्टी जाहीर करून दुपारच्या वेळी व्ही. सी. आर. द्वारे सर्व कलाकार व कर्मचा-यांना ‘जोकर' दाखवायचं ठरवलं होतं!

लक्षदीप ॥ ३५