पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/269

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

१. चिंब चिंब चेरापुंजी ‘खुबलेई’ जन्मभूमी केरळ, पण भारतीय प्रशासन सेवेमध्ये मेघालय केडर मिळालेले आता मेघालयाचे पर्यटन सचिव - त्यांनी निरोप देताना म्हटलं ‘खूबलेई... | हा शब्द कालपासून मेघालयात कानावर सतत पडत होता आणि रुंजी घालत होता. किती नादमर्यादा, संगीतामध्ये भिजलेला शब्द होता, जो खासी लोक अभिवादनासाठी वापरत. आम्ही अभावितपणे नमस्ते म्हटलं, की प्रतिपादन यायचं ते ‘खूबलेई...' मेघालयाची राजधानी असलेल्या शिलाँगमध्ये चर्च पाहताना पाद्रीबाबानं आशीर्वाद देतानाही हेच म्हटलं होतं, ‘खूबलेई, - गॉड ब्लेस यू' या अर्थानं! मेघालयाच्या पर्यटन सचिवांचा निरोप घेऊन आम्ही टॅक्सीनं निघालो होतो ते चेरापुंजी पाहण्यासाठी. त्यासाठी त्यांची शुभकामना होती. ‘खूबलेई...' वळणावळणाचा नागमोडी रस्ता, डोळ्यांना सुखावणारी चहूबाजूंची रेशमी हिरवळ. शिलाँगपेक्षा कमी उंचीवर चेरापुंजी असल्यामुळे काहीसा उताराचा रस्ता. प्रसन्न, खेळकर आणि चैतन्यमय हवा... त्यामुळे प्रवासाचा छान मूड.... | आम्हाला पाहायचं होत जगातलं सर्वात जास्त भिजणारं गाव - चेरापुंजी. लहानपणी भूगोल अभ्यासताना पक्कं ध्यानात राहिलेलं गाव. दरवर्षी सरासरीने १२०६३ मिलिमीटर म्हणजे सुमारे ४८० इंच पाऊस पडणारं गाव. | मेघालयाच्या पर्यटन सचिवांनी दिलेल्या रंजक माहितीमुळे मनात उत्सुकता होती, केव्हा एकदा चेरापूंजी येईल असं झालं होतं! “फ्रेंडस्', आमच्या सात आय. ए. एस. ऑफिसर्सच्या मसूरी प्रशिक्षणाचा भाग म्हणून भारत दर्शनासाठी उत्तर - पूर्व भागात प्रवास करणा-या गटाला संबंधित पर्यटन सचिव म्हणाले, “मला हा प्रश्न अनेकजण विचारतात की, चेरापुंजीला कोणकोणते टूरिस्ट स्पॉट्स आहेत पाहण्याजोगे? मी असं म्हणेन की पूर्ण शहर. तिथली ‘आगे हवा' आणि स्थानिक खासी माणसे - सारं काही पाहण्याजोगं आहे. मुख्य म्हणजे प्रवाशांनी पाहण्यासोबत महसूस करायचं असतं ते गाव, ती माणसं आणि त्यांचं लक्षदीप । २६९