पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/236

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

१. अखेरची रात्र
 (पडदा वर जातो. खुर्चीवर पाठमोरा बसलेला अब्बास. समोरच्या रायटिंग टेबलवर बसून डायरी लिहीत आहे. पूर्ण रंगमंचावर काळोख. फक्त पाठमोच्या अब्बासवर प्रकाशझोत. पाश्र्वभूमीवर त्याचा आवाज. लेखनातले शब्द प्रेक्षकांना ऐकू येतात.)
आवाज : तू दिलमें तो आता है - पर समझ नहीं आता.

 पर जान गये की, तेरी पहचान यही है! गुरू... वाटलं होतं तसंच होतंय. ‘अखेरची रात्र' ही तुझ्या जीवनावरची कादंबरी तुझ्या मनाचा तळ गाठण्याचा प्रयत्न करत लिहिली खरी, पण तेव्हाही वाटलं होतं, हातातून, मनातून पाण्यासारखं काहीतरी निसटून गेलंय... मला जे भावलं, प्रत्ययास आलं तेवढंच तुझं रूप, जीवन नव्हतं. त्याही पलीकडे तू कितीतरी उरला होतास... आज तुझ्याच आयुष्यावर लिहिलेल्या कादंबरीसाठी पुरस्कार स्वीकारताना प्रेक्षकात बसलेल्या प्रेरणा आणि प्रतिभा यांना पाहिलं तेव्हा कादंबरीसंदर्भात लिहून झाल्यावर जे वाटतं होतं, तेच पुन्हा प्रकर्षानं वाटायला लागलं... मला समजलेला गुरू किती अपुरा होता... माझा मित्र, लेखक, कलावंत म्हणून मला समजलेला, मी चितारलेला गुरू... पण त्या पलीकडे प्रेरणा आणि प्रतिभेच्या वाट्याला तू कसा आला होतास? त्या दोन स्त्रियांच्या नजरेतून तू काही वेगळा होतास का?... असावास असं आज मला त्या दोघींच्या चेह-यावरचे हरवलेले भाव पाहून वाटलं. आणि ते आज मला एक माणूस म्हणून, एक लेखक म्हणून जाणून घ्यायचंय. आज त्या दोघींना मी बोलवलंय इथं. तू गेल्यावर आज कितीतरी वर्षांनी त्या दोघींना एकत्र भेटणार आहे. एकीच्या प्रगतीचा वारू चौफेर उधळलेला, तर दुसरी दारू आणि अश्रूच्या दलदलीत रुतून बसलेली - उनका सामना में कैसे कर पाऊंगा गुरू? समझ नही आता, पण खैर, आज त्या माझ्या महेमान आहेत, त्यांच्या मुखातीब जाणं

लक्षदीप ■ २३७