पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/237

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

भाग आहे. (रंगमंच उजळतो. अब्बास रंगमंचाच्या कोप-यात जात दार उघडतो. प्रेरणा व प्रतिभा प्रवेश करतात. यावेळी पूर्ण शांतता. अब्बासच्या समोर प्रतिभा तर त्यांच्या दोघांच्या समोर प्रेक्षकांकडे तोंड करून प्रेरणा बसते. त्यांच्यावर प्रकाशझोत. अब्बास गोरापान, धिप्पाड. तंग सलवार व तलम मखमली झब्बा. डोळ्यात शांत स्थिर भाव. एकूण खानदानी व्यक्तिमत्त्व. प्रतिभा, अभिजात मुस्लीम सौंदर्याचा नमुना. प्रौढत्वाकडे झुकलेली पण तारुण्य व सौंदर्य टिकवून असलेली. उंची काळी रेशमी साडी व कोपभर ब्लाऊज, केसांची घरट्यासारखी रचना. अत्यंत बोलका चेहरा. पण उदासीनतेची झाक असलेला प्रेरणा टिपिकल बंगाली, सावळ्या सौंदर्याची धनीण. केस मोकळे सोडलेले, पांढरी साडी व ब्लाऊज, मोठाले पाणीदार डोळे हसरे, रुदन जाणवणारी नजर.) अब्बास : (शांततेचा भंग करत सहज स्वरात) अरे, दोघी एकदम आलात.. या.. बसा... प्रेरणा : मीच तिला आग्रहानं आणलं... इतक्या वर्षानंतर कशाला हवेत क्षुद्र | रागलोभ... प्रतिभा : का मला बोलावलंत तुम्ही? मला यायचं नव्हतं... अब्बास : दारापर्यंत तर येतेस आणि भेटायचं नव्हतं म्हणतेस? कमाल आहे तुझी. आता आत तर याल की नाही दोघी? (प्रेरणा सहज तर प्रतिभा नाईलाजानं आत येते. दोघीही खुच्र्यावर बसतात. अब्बास उभाच. काही क्षण शांतता. अब्बास वातावरण निवळवायचा प्रयत्न करत) बरं वाटतंय आज तुम्हा दोघींना बघून. प्रतिभा : तुम्हाला कुठे मला भेटायचं होतं भाईजान? तुमच्या आणि प्रेरणाच्या लेखी मी तर व्हिलनच ना? गुरूच्या आत्महत्येला कारणीभूत ठरलेली (अब्बास अस्वस्थ, काही बोलायचा प्रयत्न करतो पण त्याला शब्द सुचत नाहीत. काही क्षणानंतर) प्रेरणा : सत्य फक्त एवढंच आहे की आपण तिघंही आयुष्यातलं अनमोल अस । काहीतरी हरवून बसलोत. मैं तो बस उसी अभाव में जी रही हूँ और पी रही हूँ. पविभा. भाईजान, फंक्शनला पण ती पिऊनच आली होती... तिला सावरा तुम्हा. माझ्या मनाचा विचार नाही केलात तरी चालेल. मला फक्त दु:खाचं छान अॅक्टिंग करता येते असं एखादा तुम्हीच म्हणाला होतात ना? अब्बास : (खजिल होत) मी... मी... गुरूचा पक्षपाती होतो.. आहे. पण आज तुमच्या नजरेतून मला गुरू समजून घ्यायचाय. २३८ । लक्षदीप