पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/159

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

होतो बघा! दर वर्षाला एक-दोन सर्पदंशाचे मृत्यू ठरलेले बघा...!” | पुन्हा मनात एक हताशतेची उठलेली लहार... सर्पदंशावर इलाज होऊ शकतो, हे त्याचं विज्ञाननिष्ठ मन आजवर ग्वाही देत आलेलं; पण आज ते खरं वाटेना... त्याला आपली उच्च तांत्रिक डिग्रीही फोल, कवडीमोलाची वाटू लागली. “आमच्या वाडीला तामुलवाडी हे नाव इथं मिळणाच्या स्ट्राँग कडक तंबाखूच्या पिकामुळे पडलं बघा साहेब! सरपंच सांगत होते, “पण कधी कधी वाटतं, यामागे देवाची करणी असावी! अशा पुराच्या प्रसंगी घरच्या घरी तंबाखूची पानं वळून विडी केली जाते. तिच्या झुरक्यात वेदना हलक्या होतात...' पुन्हा एकदा थक्क व्हायची अक्षयवर आलेली पाळी... गावात रोगावर उपचार करायला एकहीं डॉक्टर वा आरोग्यसेवक नाही... त्यामुळे शरीरवेदनेवर इथल्या कडक तबाखूचं सरळ सेवन करणं वा बिड्या वळवून फुकणं हाच एक अक्सीर रामबाण उपाय त्यांना माहीत होता, सहज मिळणारा होता. त्याला स्त्रिया व मुलेही अपवाद नव्हती. मास्तराच्या मुलीची ती कळ जिरवणारी सुईण मधूनमधून तंबाखूची गोळी दाढेखाली ठेवण्यासाठी देत होती. | तापाने फणफणलेल्या पोरांना निपचित पडून राहण्यासाठी अशीच गोळी आईबाप द्यायचे... “पुरे सरपंच, पुरे - मला माझीच शरम वाटू लागली आहे!" अक्षय म्हणाला. त्याचा स्वर कमालीचा प्रांजळ वाटत होता. इथून पळून जावे, ही नोकरी सोडावी व मुबईला परत आपल्या परिचित - संपन्न, भरपेट विश्वात जावं हा मोह होत होता. पण विवेकी मन टोकत होतं, आत्मपरीक्षणाला भाग पाडीत होतं! | पण ते किती त्रासदायक, छळवादी होतं! । अशाही स्थितीत तुम्ही कशाच्या बळावर जगता सरपंच साहेब? अक्षयनं न राहवून विचारलं. कारण तो कालपासून तामुलवाडीत ग्रामस्थांच्या सोबत होता. त्यांची जगण्याची विजिगीषा पाहात होता. | तामुलवाडी कुणी या ठिकाणी बसवली, माहीत नाही; पण गावाचा हा पुराच्या पाण्यानं वेढा पडण्याचा प्रसंग बहुतेक दरवर्षी यायचा! अडकलेली बाळंतीण, वाहून लली झोपडपट्टी, साप-विंचवांचा सुळसुळाट, जगापासून संपर्क तुटल्यामुळे धान्यमाठ-मिरची नाही, रॉकेल नाही, की पिण्यासाठी शुद्ध पाणी नाही. गावात व पंचक्रोशीत डॉक्टर वा तज्ज्ञ नर्सही नाही... पुराचा वेढा पडला की जीवन वाटणारे पाणी मृत्यूचे विक्राळ रूप घेऊन येतं | आणि दरवर्षी चार-दोन मानवी बळी घेतं. त्या पुराच्या पाण्याचा उरी धड़की वणारा आवाज मग अणुरेणूत सामावला जातो... जिल्ह्यासाठी वरदायिनी, पूज्य उरलेल्या पूर्णामायेला इथं मात्र यमाची - तमाची - सहोदर मानलं जातं... लक्षदीप ॥ १५९