पान:लक्षदीप (Lakshadip).pdf/157

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नसल्यामुळे त्यांचे अहवाल नकारार्थीच असायचे...
 एकाएकी सरपंचाला त्याच्याबद्दल आपुलकी वाटू लागली. “अगदी बेस बोललात तुम्ही साहेब... चला, आम्ही तुमास्नी वाडीला नेतो."
 मीटिंग संपून वाडीला नदीपर्यंत जायला तीन-चार वाजतील. मग पाहणी होता होता अंधार पडेल! तहसीलदार पेन्शनला आलेले, जाडजूड अंगाचे होते. त्यांना टॉक-यातून जाणं व पायी गाव तुडवून पाहणी करणं जिवावर आलं होतं. “आमदार साहेब - पुन्हा कधीतरी तारीख द्या. आज वेधशाळेची तारही आली आहे - अतिवृष्टीचा संभव आहे. पूर आला तर तुम्ही-आम्ही अडकून पडू!"
 मघाशी रोखठोक बोलणारा ग्रामस्थ पुन्हा उपहासानं हसत तेवढ्याच ठणठणीतपणे म्हणाला, “वा साहेब - आम्ही हरसाल हे संकट, ही अस्मानी - सुलतानी झेलतो. तुम्हाला प्रत्यक्ष पहाया मिळालं तर निदान मंजुरी तरी द्याल..."
 आमदारांना आता नाही म्हणणं शक्य नव्हतं. ते म्हणाले, "ठीक आहे रावसाहेब! वेधशाळेचा अंदाज जून उलटला तरी खरा ठरत नाहीय - जेमतेम मुतल्याप्रमाणे पाऊस झालाय थोडासा - वस्... जाऊन येऊ या... पुन्हा माझंही बजेट सेशन आहे। - वेळ नाही मिळणार. हे आमचे नवे इंजिनिअर अक्षयबाबू काय तोडगा काढतात हे मला पाहायचं आहे."
 ते सर्वजण तामुलवाडीला पोचले तेव्हा तहसीलदारांना चालण्याच्या श्रमानं धाप लागली होती. त्यांनी पाटलाच्या वाड्यावर विश्रांती घेण्याचं ठरवलं. आमदारांनाही त्यांच्या पक्षकार्यकर्त्यांनी घेरा घातला, तेव्हा अक्षयसोबत सरपंच आणि तो ग्रामस्थ उरला. त्यांनी पूर्ण गाव चारी बाजूंनी फिरून पाहायला सुरुवात केली असता पावसाचे थैव तुटू लागले. मग चक्क गारांच्या वर्षावात धुंवाधार पर्जन्यवृष्टी सुरू झाली... पाहाता पाहाता ओढे भरून वाहू लागले. शांतपणे झुळझुळणारी पूर्णा नदी उन्मत्त पावू लागली... आणि पूर आल्यामुळे त्यांना तामुलवाडीतच मुक्काम ठोकावा लागला होता!
 पाटलांच्या वाड्यावर चहा-फराळ झाला आणि पुन्हा अक्षय बाहेर पडला. पुन्हा एकदा त्याला तामुलवाडी पाहायची होती...
 तुकड्या तुकड्यानं जाणवणारी दृश्य मालिका - पण सामूहिक परिवार मात्र त - एकरी! सुन्न करणारं विदारक वास्तव जेव्हा समोर येतं तेव्हा हताशतेखेरीज अन्य काही जाणवत नाही.

 सेवानिवृत्त मास्तरांची लेक माहेरी बाळंतपणाला आलेली - मूल आडवं पोटात "ल - कालपासून तळमळत आहे. तिला दाखवायला, उपचाराला प्राथमिक ""ये कद्राला न्यायला हवं... पूर ओसरला तरच जाता येईल. पण गावाच्या चारी दिशांच्या वाटा पाण्याने गिळलेल्या...

लक्षदीप ॥ १५७