पान:लंकादर्शनम्.pdf/99

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८०

 नारळ, भात, तंबाखु, कोको वगैरे पिकांच्या जमीनी समान्यतः सिलोनी लोकांच्या ताब्यांत आहेत. रबर व चहा ही पिके सामान्यतः पाश्चात्यांच्या ताब्यात आहेत.

 तांदुळाची लागवड सामान्यतः नारळांच्या बागांच्या मधून असते, म्हणजे दोन्ही बाजूस प्रचंड बागा असून मधून एक पट्टी तांदुळाच्या लागवडी खाली असते. सीलोनमध्ये वोंटकी (सामान्यतः वॉटोळी) अशी तांदुळाची जात आहे. तांदूळ चवीस बरा परंतु शिजविल्यानंतर राठ होणारा असा आहे.

 तंबाखूच्या जातीत सुधारणा करण्याचे प्रयत्न चालू आहेत असे दिसते. सिंगापूर कडील नारळाची ठेंगणी जातही अलीकडे बऱ्याच मोठ्या प्रमाणांत लाविलेली आहे.

 आतांपर्यंत दिलेल्या माहीतीवरून सीलोनच्या शेतीच्या उत्पनांत किती विविधता आहे, रबर, चहा, झिनीन, कोकेन वैगैरे पदार्थांच्या विपुलतेमुळे सीलोनचे व्यापारी दृष्टीने काय महत्त्व आहे व ब्रिटिश साम्राज्याचा एक घटक ह्मणून सीलोनचे काय महत्त्व आहे हे वाचकांस सहज समजेल असे वाटते,

 सीलोनचा निर्गत व्यापाराही फार मोठा आहे. उदाहरणार्थ एथून दैरसाल २६२५००० मण चहा (४० शेरांचा); ८६३८०० मण खोबरेल; २५५४६२५ मण रबर, १६१००००० मण खोबरे परदेशी पाठविले जाते.

 गहू, तांदुळ, बाजरी वगैरे धान्ये पिकविणाऱ्या शेतकऱ्यांस भयंकर चढाओढ करावी लागते कारण ही धान्यें अनेक ठिकाणीं पिकतात. तसेच एखादेवर्षी पीक अवर्षणाने बुडालें म्हणजे त्या शेतकऱ्यांची अतिशय तारांबळ होते. परन्तु चहा, खोबरें व रबर यांची निपजकरणारांनां धंद्यांत एक प्रकारची मक्तेबाजी आहे. श्रम कमी असतात व पीक बुडण्याचे भय फारच अल्प असतें.