पान:लंकादर्शनम्.pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
७९

वर्षे टिकते व झाड तोडल्यावर लाकूड एक लक्ष वर्षे टिकते. या लौकिक समजुतीवरून हे झाड फार टिकाऊ आहे ही गोष्ट मात्र मनावर पूर्णपणे बिंबते.



सिट्रोनेला

 हे एक प्रकारचे गवत आहे. मातरा गांवाजवळ हे पुष्कळ पिकते लांबून याचा लिंबा (कागदी लिंबू ) सारखा वास येतो. याचे तेल काढण्याच्या येथे पुष्कळ भटया आहेत. तेल उर्ध्वपातनाने काढतात. याचा उपयोग सुगंधी तेलें व अत्तरे करण्याकरितां होतो.



शेतकी

 अलीकडे सीलोनमध्ये कापराच्या झाडाच्या लागवडीस सुरवात झालेली आहे. प्रस्तुतकाली कापराची पैदास जपानच्या साम्राज्यांतच होते. सीलोनमध्ये कापूर पुष्कळ उत्पन्न होऊ शकेल व असे झाले तर त्याचा परिणाम जपानवर झाल्याशिवाय राहणार नाही.

 जायफळाची झाडे ही थोडीशी आहेत. चांगले झाडे असल्यास २ ते २|| हजार जायफळे येतात. लवंगाची झाडे ही तुरळक आहेत पण यांची संख्या थोडी आहे.

 अननसाची लागवड पुष्कळच आहे. हिंदुस्थानांत शेताच्या कडेला जसे घायपताचे कुंपण असते त्याप्रमाणें सीलोनमध्ये अननसाचे कुंपण असते.

 भाकरीचा वृक्ष (Bread Friut Tree) एक मोठा वृक्ष आहे त्याला मोठाली फळे येतात. आम्ही सीलोनमध्ये होतो तेव्हां या झाडावर लहान लहान फळे सर्वत्र लागलेली होती.

 या शिवाय थोडा कापूस व तंबाखु ही पिकेही येथे होतात. सुपारीचे उत्पन्नही मोठे आहे.