पान:लंकादर्शनम्.pdf/68

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
54



भात ८३८००० एकर तंबाकू १४०००
चीना ७७००० चहा ४७०००
नारळ १०००००० रबर ५३४०००
सुपारी ६९००० कोको ३४०००
पायमरा ५०००० वेलदोडे ६०००
भाजीपाला ३२००० धान्यें २८०००
दालचिनी २६००० कापूस २४००
सिट्रोनेला ३३००० ऊंस १०००

  यावरून सीलोनमध्ये कोणती पिकें होतात व निरनिराळ्या पिकाखालीं किती क्षेत्र आहे हे समजून येईल. सीलोनमध्ये नारळ, दालचिना, सिंकोना, रबर इत्यादिकांचे उत्पन्न फारच मोठे आहे म्हणून मुख्य पिकाबद्दल पुढें सविस्तरवर्णन दिले आहे.

नारळ

 सीलोनमध्ये नारळ हे एक महत्वाचे पीक आहे. कोलंबो पासून गैली बंदरापर्यंत सुमारे ७० मैल लांबीच्या पट्यांत नारळाची फारच नामांकित अशी अखंडरायी आहे. सीलोनमध्ये जाणारा प्रवासी या सुंदर रायीकडे पाहून आश्चर्याने चकित होऊन जातो. सर्व देशभर नारळाची लक्षावधि झाडे आहेत. नारळाच्यापिकां खालीं एकंदर १० दशलक्ष एकर जमीन गुंतलेली आहे. * सर्व जगांमध्ये जेवढा नारळ पिकतो त्यापैकी ४२५ भाग फिलीपाइन बेटांत, ४१० भाग उच ईस्टइंडीजमध्यें, १५५ भाग सीलोनमध्ये, १०५ भाग ब्रिटिश मलायामध्ये व बाकीचा २५५ भाग हिंदुस्थान, लखदीव व मालदीव बेटे व झांजिबार इत्यादि भागांत होता.


*टीप :- जगांतील नारळाची एकंदर पैदास १३५० दशलक्षटन आहे व या आंकड्यांस अनुसरून वरील आंकडे दिलेले आहेत.