पान:लंकादर्शनम्.pdf/64

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



५०

 रामचंद्राचे काळीं सीलोनमध्यें यज्ञसंस्था होती हें रावण व इंद्रजित् यांनी केलेल्या यज्ञावरून स्पष्ट होते. शिवाय रावण हा पुलस्त्यऋषींचा पुत्र होता असे रामायणांत सांगितलेले आहे. रावण व इंद्रजित् यांनी देवता प्रसन्न होण्याकरितां केलेले प्रयत्न व देवी जानकीचा वध केला आहे असे दाखविण्याकारिता केलेले ऐन्द्रजाल पाहिलं म्हणजे अथर्ववेदाप्रमाणे अभिचारादिकमँही तेथे होत असत असे दिसते. रावण व त्याचे राक्षस यांनी देवांस बंदिवासांत घातले, ते आर्याच्या यज्ञांचा विध्वंस करीत, या वरून रावणाच्या कारकीर्दीत तरी ब्राह्मण व त्यांची यज्ञसंस्था लंकेतून हाक लली जात होती असे दिसते. रावणाच्या कालापासूनं तो इ. स. पूवा सुमारे ५ व्या शतकापर्यंतचा इतिहासच उपलब्ध नाहीं यामुळे या मधल्या काळांत कोणती संस्कृति लेकमध्ये नांदली हे समजण्यास मार्ग नाहीं.

 हिंदुस्थानामध्ये रामायणाखेरीज कोणत्याही प्राचीन ग्रंथांत लंकेबद्दल उल्लेख नाहीं. लंकेतील सर्वात जुने शिलालेख इ. स. पू. च्या शेवटी शतकापासून ते इ. स. च्या ५ व्या शतकांतल्या काळाचे आहेत. तसेच द्वीपस्थ वाङ्मयांतील सर्वांत जुनाग्रंथ इ. स. ३०४ ते ३२२ च्या दरम्यान आहे. कोणत्याही शिलालेखांत किंवा वाङमयांत रामरावणाचा उल्लेख नाहीं.

 अर्थात् रावणाच्या कालापासून तों विजयाच्या स्वारीपर्यंतच्या का कांत सीलोनमध्ये रावणाचें नांवही शिल्लक राहिलेले दिसत नाहीं. ख्रि. ५५ ५४३ सालीं विजय लंकेत गेला पण त्यावेळी लकेतील लोक कोणत्याही जारदार अशा धर्माचे अनुयायी नव्हते व त्यामुळेच तेथे बुद्धधर्माचा रिघाव लवकर झाला व त्याची वाढही पुष्कळच झाली.

 विजयाबरोबर किंवा महेन्द्राबरोबर ब्राह्मणी संस्कृति सलोनमध्ये ग नाहीं. ब्राह्मण धर्माचा पूर्ण द्वेष करणारी बुद्धसंस्कृति लंकेत शतकानुशतक नांदत होती. अर्थात् बुद्धलोक रामचंद्राच्या पराक्रमाचें जै स्थान (लंका)