पान:लंकादर्शनम्.pdf/65

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



५१

तेथे रामचंद्राचे स्मारक ठेवतील हे अशक्य आहे.

 ब्राह्मणांच्या वाङ्मयांतील नाना कथा घेऊन त्यांचे रूपांतर बुद्ध लोक करीत. पालिभाषेतील दशरथ जातकांत राम हा सीतेचा भाऊ होता असे सांगितलेले आहे. राम व सीता असे दोघेजण वनवासास गेले व परत आल्यानंतर त्यांचे लग्न झाले, सीताहरण व रामरावण संग्राम यांचा उल्लेखच त्या जातकांत नाहीं.

 या जातकावरून कांहीं पाश्चात्य पंडितांनी असा तर्क लढविला आहे कीं, दशरथ जातकांतील कथानक घेऊन रामाच्या अंगीं अनेक सग्दुण आरोपित करून एक महावीर ब्राह्मण कवींनी बनविला व सुंदर काव्य निर्माण करून बुद्धधर्माची पिछेहाट करण्याचा प्रयत्न केला. पाश्चात्य पंडितांनीं ब्राह्मणास नांवे ठेवण्याकरितांही कदाचित् हें तर्कट रचिलें असण्याचा संभव आहे. असो, या मुद्यावर आजपर्यंत बरेच वाङ्मय तयार झालेले आहे. लक्षांत ठेवण्यासारख्या मुख्यतः दोनच गोष्टी आहेत.

 (१) रावणाच्या कालापासून तो अर्वाचीन ऐतिहासिक कालापर्यंतच्या कालांतील ग्रंथ सीलोनमध्ये नाहीत; त्यामुळे रावणनगरीचे स्थळ निश्चित होण्यास मार्ग नाहीं.

 (२) ब्राह्मणी संस्कृति सीलोनमध्ये केव्हाही रुझली नाही, त्यामुळे रामचंद्राच्या विजय स्थानाचे स्मारक राहिलेले नाही. विजयाबरोबर ब्राह्मणी संस्कृतीचा प्रवेश सीलोनमध्ये झाला नाहीं.

 तथापि रावणाच्या राजधानी बद्दल काहीं अनुमान मात्र काढत येण्यासारखे आहे व ते अनुमान पुढील दिलेल्या सिंहली कथा व रामायणांतील कांहीं वर्णने यांवरच मुख्यतः अधिष्ठित आहे.

 (१) ट्रिंकोमालीहून अनुराधपुरास जाणा-या रस्त्यावर ५ व्या मैलां