पान:लंकादर्शनम्.pdf/44

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



३३

 सिंहली लोक थोडे कृष्ण वर्णाचे, साधारणतः आपल्या इकडील मराठे लोकांसारखेच आहेत, उंची आपल्या महाराष्ट्रीय लोकांसारखीच असून ते हाडापेराने मध्यम आहेत, मासे, केळी, नारळ हे नित्य खाण्याचे पदार्थ असल्यामुळे ते सशक्त आहेत. तथापि सोलापूर, नासिक, नगर वगैरे प्रांतीं नांगराच्या मागें काम करणारा शेतकरी जसा राकट, मजबूद आणि सोशिक असतो तसा मात्र सिंाहिली नाही आणि याचे कारण उघडच आहे, की तेथील शेतक-यास भारी मेहनतीची कामें करण्याचे प्रसंग येत नाहीत.

 सिंहली पुरुष कमरेभोंवती धोतर गुंडाळतो, अंगांत जाकीट किंवा सद्रा घालतो, शिरोभूषण किंवा टोपी घालत नाहीं. डोकच्या केसावर वाटोळा कंगवा असतो. सिलोनी स्त्रिया अंगांत जाकीट घालून लुगड़े नेसतात. ख्रिस्ती लाकांप्रमाणे पेहेराव करण्याकडे सर्वत्र प्रवृत्ति वाढत आहे. सिंहली बुद्धिमान् असून मेहेनती आहेत, आदरातिथ्य करणे त्यांना प्रियं वाटते. तथापि ते जरा जास्त लवकर रागावतात असे म्हणतात.

 पुष्कळसे आरब व्यापारी कित्येक शतकापूर्वी येथे येऊन स्थायिक झाले आहेत. त्यांनी मूर असे म्हणतात. मूर लोक व्यापार करितात कांहीं थोडे शेतीवरही उपजीविका करतात. पोर्तुगीज आणि डच लोकांचा ज्यावेळी पूर्वेकडील प्रदेशावर अम्मल होता त्यावेळी आपल्या जातीचे व वंशाचे लोक असल्याखेरीज आपणांस पूर्वेकडील प्रदेशांवर साम्राज्य चालविता येणार नाहीं” असे त्यांस वाटू लागले होते व म्हणून त्यांनी आपल्या ऑफिसर्सना व शिपायांना एतद्देशीय स्त्रियांशी लग्ने करण्यास उत्तेजन दिले यामुळे सिंहली स्त्रिया व पाश्चात्य पुरुष यांपासून झालेली प्रजा सिंहलद्वीपांत बरीच आहे. या मिश्र प्रजेस “बरगर्स असें ह्मणतात. यूरोपियन्स वे घरगर्स मिळून एकंदर लोकसंख्येच्या एकदशांश आहेत.

 प्राचीनकाळीं तामीळ लोकांनी सीलोनवर स्वान्या केल्या व कांहीं लोकांनी उत्तर आणि दाक्षण किना-यावर कायमची वस्ति केली, चहाच्या