पान:लंकादर्शनम्.pdf/38

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



२८

 या बेटांत पर्जन्यमान सर्वत्र पुरेसे आहे तथापि शेतकऱ्याला केवळ निसर्गाच्या लहरीवर अवलंबून रहावे लागू नये ह्मणून पूर्वीच्या राजांनी जागोजाग लहान मोठे तलाव बांधलेले आहेत. केलवेय्या, पदविय्या, मिनरविय्या, व राक्षसी तलाव हे प्रसिद्ध तलाव आहेत. नुवरकेलविय्या भागांत तर प्रत्येक खेड्याला एक एक तलाव आहे. याप्रमाणे पाण्याची सर्वत्र व्यवस्था असल्यामुळे पर्जन्याभावामुळे पिकाची खराबी सहसा होऊ शकत नाहीं. पूर्वीच्या राजांनी २० मैल परिघाचा व १२ मैल लांबीचा असा एक तलाव बांधला होता परन्तु कालचक्राच्या गतीने त्याचे पूर्वकालीन वैभव सध्यां नष्ट झालेले आहे.

 यावरून राजे लोक प्रजेच्या पोटापाण्याची सोय किती तत्परतेने पहात असत याची कल्पना येते महाराष्ट्रासारख्या प्रांताची दुष्काळामुळे जी दुर्दशा कित्येकवेळां उडते तसा प्रसंग सीलोनमध्ये सुदैवाने केव्हाही येत नाहीं.

नकाशा नंबर १ पहा.

 सीलोनमध्ये प्रवास करावयास जून, जुलै आणि आगष्ट हे महिने सर्वतोपरीने चांगले असतात असे इंग्रज प्रवाशांस वाटतें. जानेवारी, फेब्रुवारी व मार्च महिन्यांत येथे पाऊस फार कमी पडतो व हे उन्हाळ्याचे दिवस आहेत असे ह्मणण्यास हरकत नाहीं.

 सीलोनमधलि शेतीची किंवा इतर उत्पन्नाची माहीती देणाच्या अगोदर हिंदुस्थान सरकारचे एज्युकेशनल कमिशनर मि. एच्. शार्प यांचे या बेटाबद्दलचे उद्गार वाचनीय आहेत ह्मणून ते येथे प्रथमतः दिल्याशिवाय राहवत नाहीं. शार्पसाहेब हाणतातः

 "लंकेत सोन्याच्या विटा ही पौराणिक कल्पना खोटी नाही. प्राचीन काळी ही ह्मण त्या देशाला जशी लागूं असे तशी अद्यापही लावण्यास हरकत नाहीं. रत्न व मोती यांची निपज विचारात घेतली नाहीं तरी चहा, रबर, प्लंबँगो, कोका, सुपारी, नारळ, दालचिनी, क्विनीन वगैरे पदार्थ ह्मणजे