पान:लंकादर्शनम्.pdf/37

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
२७

 सीलोनमध्ये South west नैऋत्येकडून North west वायव्ये कडून पर्जन्याचे वारे वहात येतात. S.W. नैरेत्येकडून येणारे वारे अत्यंत नियमित वहातात व त्यायोगें १० ते २० मेपर्यत पाऊस येतो. मेचे सुमारास सुरू होणारे पावसाचे आरंभीं भयंकर मेघ गर्जना व विजांचा कडकडाट होतो व क्षणार्धात जिकडे तिकडे पाणीच पाणी होऊन एका घटकेपूर्व कोरड्या ठणठणीत असणाऱ्या नद्या फों फो वाहू लागतात.

 पश्चिम आणि दक्षिण बाजूस पुष्कळ पाऊस पडतो. मध्यभागीं पर्वत असल्यामुळे पर्जन्याचे वारे अडविले जातात व त्यामुळे तेथेही पुष्कळच पाऊस पडतो. उत्तरेस आणि पूर्वेस मात्र पर्जन्याचे मान कमी असते.

 पर्वतापासून किनारा फार जवळ असल्यामुळे एथे नद्या लहान आहेत व जेव्हां पर्जन्य पडतो त्याचवेळी मात्र नद्यांना पाणी असते केळनी गंगा व केळुगंगा या नद्यांचाच काय तो जलमार्ग ह्मणून उपयोग होतो व त्यांच्या मुखांतून ४० ते ५० मैल जहाजे जातात.

 सीलोनमधील मुख्य शहरांचे उष्णतामान व पर्जन्यमान पुढीलप्रमाणे आहे.-

समुद्र सपाटपिासून उंची वार्षिक सरासरी उष्णतामान
डिग्री
सरासरी वार्षिक पर्जन्यमान
इंच
कोलंबो समुद्र सपाटीपासून
१० ते ५० फूट
८० ८७
जँफना ८१ ४९
गँले ८० ९२
कलुतारा ८० १०३
रत्नपुरम् ८४ फू. ८१ १५१
कुरुनैगाला ३८० ८१ ८३
कँडी १६५० ७६ ८४
वडुला २२२५ ७३ ७३
हँटन ४०४१ ६६ १४४
जुवाराएलिया ६२४० ५९ ९३