पान:लंकादर्शनम्.pdf/24

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१५

}समर्थन केले. भिक्षुनें तो प्रश्न तेवढ्यावरच सोडला तेव्हा मी विचारले तुमचे ध्येय काय आहे. तो म्हणाला आम्ही देव होऊ इच्छितो. मी विचारले देव होणार म्हणजे काय होणार, भिक्षूने उत्तर दिलें देव होणार म्हणजे परलोकीं गेल्यावर एथल्या पेक्षा जास्त सुखें व चांगले पदार्थ यांचा उपभोग घेणार. तुह्मांस देव व्हावे असे वाटत नाहीं काय ?

 मी ह्मणाला स्वगांतील साखर एथल्या साखरे पेक्षा जास्त गोड असते असे कशावरून ? स्वर्गातील साखर एथल्या साखरे पेक्षा जास्ते गोड असेल तर ती अत्यंत गोउ असल्यामुळे रसनेंद्रियाला सहन होणार नाहीं व असे झाले की इंद्रिय आणि विषय यांचा हीन योग होऊन सुख कमी होईल. रसनेंद्रियाची विषयग्रहणकरण्याची तीव्रता किंवा शाक्त कमी करावी लागेल. एवंच तुमच्या स्वर्गात एथल्या पेक्षा जास्त मधुर रसाचा आस्वाद घ्यावयाचा असल्यास रसघेणारे इंद्रिय जास्त स्थूल असले पाहिजे म्हणजे स्वर्गात गेल्यावर तुमची इंद्रियें कमी कार्यक्षम होतील. शिवाय तेथे कडू रस नसल्यास साखरेच्या गोडीचीही किंमत राहणार नाहीं. येथे असतांनाच काय भोग घ्यावयाचे असतील ते घ्या.

 यावर भिक्षुकडून कांहीं विशेष उत्तर येईना. श्रीयुत वाघ यांच्या मनांत हा शुष्क वाद पुढे चालू नये असे होते ह्मणून त्यानीं परत जाण्याबद्दल गर्दी केली. बाहेर इतर मंडळीही परत जाण्यास उत्सुक होऊन गर्दी करू लागली. म्हणून हा वाद टाकून आही बाहेर पडलो.

 तेथून सर्वजण श्री. कारखाननीस यांजकडे गेलो. त्यांनी सर्व मंडळीस चहा, चिवडा, रव्याच्या वड्या इत्यादिकांचा अल्पोहार दिला. त्यांच्या मुलींनी पेटीवर तामील व तेलगू पद्ये ह्मणून दाखविली. ८-१० वर्षांची मुले चांगले इंग्रजी बोलतात हे पाहून सर्व लोकांस आश्चर्य वाटले. मिसस कारखाननीस यावेळी अगदीं आसन्न प्रसूत होत्या. एकंदर सर्व कुटुंब अत्यंत प्रेमळ असे असल्यामुळे आमचा तास दीड तास फारच आनंदांत गेला.