पान:लंकादर्शनम्.pdf/23

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



१४

कळालें नाहीं. पुष्कळ स्त्री पुरुष हे प्रवचन ऐकत होते. नंतर आम्ही मीदरांत शिरलो. मंदिरांत भव्य अशी बुध्दमूर्ति होती. नाना प्रकारच्या रंगांनी ही सुशोभित केली होती. मूर्तिच्या चारी बाजूस मूर्ति व भिंतींवर बुध्दचारितांतील निरनिराळे प्रसंग चित्रित केलेले होते.

 बुध्दजन्म, त्याची तप:श्चर्या, गृहत्याग वगैरे जातकांतील कथा, बुध्दाचे स्वर्गारोहण व तेथील देवतांस उपदेश, त्याचे अवतरण व पृथ्वीवरील निरनिराळ्या राजांस उपदेश करणे इत्यादि अनेक प्रसंग त्या ठिकाणीं उत्तम रीतीनें चित्रित केलेले होते. आम्हांस असे वाटले की आह्मीं रंगभूमीवरच उभे आहोत.

 नंतर तेथे बुध्दभिक्षु आहेत की नाहीत याचा तपास केला. दोन तीन भिक्षु भेटले पण कोणासही इंग्रजी येत नव्हते. नंतर आम्ही दुसन्या देवळाकडे गेलो. हे मंदीरही पहिल्या मंदीराप्रमाणेच चांगले होते. एक नवीन उंच इमारत बांधण्याचे काम चालू होते. तेथे कोणी भिक्षु आहेत की नाही हे पहाण्यास मी सुरवात केली. एका इसमाने ७।८ भिक्षु बसले होते तेथे नेलें. एका वुध्द भिक्षुस इंग्रजी येत होते तेव्हां आमची बोलण्यास सुरवात झाली. आम्ही कोण कुठले इत्यादि प्रश्न झाल्यावर भिक्षुने मला विचारले तुह्मास तुमचा धर्म कसा वाटतो. * आमच्या धर्माची शिकवण अशी आहे की देव एक आहे व त्याच्या आज्ञेनुसार ऐहिक गोष्टींत पूर्ण मन घालून आर्थिक उन्नति करावी. देवाने दिलेलें शरीर नीट वर्धन करून त्यास या सृष्टीचा योग्य उपभोग द्यावा व हे सर्व करीत असतांनां नीतीचे नियम पाळून ईश्वरपद मिळवावे, असे मी उत्तर दिले.

 ही माझी विचारसरणी भिक्षूच्या लक्षात आली नाहींसे दिसले माझ्या बोलण्याचा रोख संन्यासदीक्षा व सर्वसंग त्याग या विरुद्ध होता पण भिक्षुला ‘देव एक आहे' या माझ्या ह्मणण्याचे आश्चर्य वाटले व तो म्हणाला “देव एकच कसा असेल ? मी आपल्या म्हणण्याचे थोडक्यांत