पान:लंकादर्शनम्.pdf/15

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

कोट होता पण त्याचे नशीब दांडगे, मंडपम्च्या शास्त्रीय ज्ञानाची आंच त्याला लागली नाहीं; पण कोठे कोणास भेटावयास जावयाचे झाल्यास स्वच्छ पोशाख असावा या हेतूने परिटाकडून स्वच्छधुवून आणिलेला पांढरा शुभ्रकोट, शर्ट व डोक्याचा रुमाल यांना शास्त्रीय ज्ञानाची इतकी आंच लागली की ते पूर्वी कधीं धुतले होते की नाही याबद्दल माझी मलाच शंका येऊ लागली.

 मुलांच्या करितां कांहीं खाण्याचे पदार्थ आम्ही बरोबर घेतले होते ते खाऊन टाका, बरोबर नेऊ नका, त्याने तुह्मास रोग होईल असे एकजण सांगू लागला. मला या ज्ञानाचा रागही आला आणि हसूही आलें. पहिली गोष्ट अशी की नाशिक सोडून आह्मी मुलेबाळे घेऊन निघालो तेव्हां कोणीही वाटेंत आजारी पडू नये प्रवास निर्विन्न झाला पाहिजे याची आझाला काळजी विशेष. मंडपम् कॅप वाल्यांना आमच्या आरोग्याबद्दल काय काळजी ? दुसरी गोष्ट अशी की बोटीवर चढल्यानंतर बरोबर घेतलेले पदार्थ खाल्ले तर आह्मी आजारी पडणार पण कॅपमध्ये दोन तीन तास अगोदर खाल्ले तर मात्र आजारी पडणार नाहीं ते खाऊन टाका असा आग्रह. तेव्हां हें विलक्षण तर्कशास्त्र किंवा शास्त्रीय ज्ञानाला लागलेली आग पाहून मला गप्प बसवेना. मी उठून मुख्य डाक्टरकडे गेलो व तेथील तर्कशास्त्र असे उलटे कसे याबद्दल विचारणा केली. डाक्टर जरा सूज्ञ दिसला त्याला माझं ह्मणणे पटले व त्याने ते पदार्थ बरोबर नेण्यास परवानगी दिला.

 नंतर आमची शरीरें निर्जन्तुक व्हावीत झणून स्नानगृहांत आम्हांस सोडण्यात आले. नान प्रशस्त असून डोक्यावर पाण्याचे फवारे येतील अशी रचना आहे. पाणी थंड होते व थोडे खारट होते मला वाटते ते समुद्राचे पाणी असावे. स्त्रियांच्या केसांतून सीलोनमध्ये जन्तु जाऊ नयेत म्हणून ल्यांना डोक्यावरून केस धुवून स्नान करण्यास सांगितले.

 आम्हांस ही सर्व गभ्मत आहे असे वाटत होते व काही झाले तरी