पान:लंकादर्शनम्.pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११६

दिवसोंदवस कमी होऊं लागले आणि शेवटी हा राजवाडा दाट अरण्यामध्ये पूर्णपणे बुडून गेला होता.

पवित्र पिंपळ

 अनुराधपुरांत शिरतांच पश्चिमाभिमुख बुद्धदेवालय आहे. आंत गेल्यावर मोठे पटांगण लागते. त्या पटांगणांत पूर्वाभिमुखी भागांत बुद्धाची मूर्ति आहे व उत्तरेच्या बाजूस एका मोठ्या ओट्यावर लहानसा पार आहे. पारावर पिंपळाचे झाड आहे. झाडाची जाडी अगदी बेताची ह्मणजे फार तर १|२ फुटाची आहे. पाराकडे चढून जाण्यास पायऱ्या आहेत व पाराभोंवतीं गजांचे कुंपण असून दारास कुलूप असते. भक्त लोक समोर उभे राहून त्या पवित्र वृक्षाचे दर्शन घेतात. हा पिंपळ २२५० वषांपेक्षा जास्त जुना आहे असे ह्मणतात.

 सम्यक्ज्ञान प्राप्त करून घेण्याचे नाना उपाय केल्यानंतर भगवान् बुद्ध निरंजना नदीचे तीरीं पिंपळाचे झाडाखाली ध्यानस्थ बसला व तेथे त्याने आपले ध्यान चालविलें. बुद्ध ध्यान करीत बसला असतांना माराने (खिस्त धर्मात ज्याप्रमाणे सैतान आहे त्याप्रमाणे बुद्ध धर्मात मार आहे) त्यास ध्यानभ्रष्ट करण्याकरितां अनेक प्रकारे मोह पाडण्याचा प्रयत्न केला. पण बुद्ध विजयी झाला व त्यास सम्यक्ज्ञान प्राप्त होऊन त्यास बुद्धपण प्राप्त झाले.

 यामुळे बुद्धलोक पिंपळाच्या झाडास फार पवित्र मानतात. ज्या झाडाच्याखालीं बुद्धास सम्यक्ज्ञान प्राप्त झाले त्या झाडाची खांदी संघ-मित्राने खिस्त पूर्व २८८ सालीं सीलोनमध्ये नेऊन लाविली. या झाडाच्या दर्शनाकरितां लक्षावधि लोक जातात. यात्रेकरू या झाडाचे पान मोठ्या श्रद्धेनें प्रसाद ह्मणून नेतात व हें पान मिळणेही मोठ्या वशिल्याचे काम होऊन बसते.

 या देवळांत पूर्व बाजूच्या भिंतीजवळ एक झाड आहे त्या झाडाला पत्र्याने मढविलेले असून त्याची पानेही पत्र्याचीच आहेत,