पान:लंकादर्शनम्.pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



११५

ह्या पॅगोडा बांधावयास सुरवात केली पण वांधकाम पुरे होण्याच्या आंतच तो आजारी पडला. पुढे दत्तगामिनीच्या भावाने (तिस्स राजानें) तो पुरा केला. हे काम खिस्तसनापूर्वी दुसऱ्या शतकांत झाले.

ब्रेझन पॅलेस

 तामील राजा एलया याने झैसोरकडून येऊन सिंहलद्वीपावर स्वारी केली त्याचा पराभव दत्तुगामिनी राजाने केला व या विजयाचे स्मारक ह्मणून खि. पूर्व दुस-या शतकांत त्याने हा राजवाडा बांधला. हा राजवाडा नऊ मजली होती नंतर त्याचा उपयोग भिक्षु लोकांना राहण्याकरिता होऊ लागला व तेथे एक हजार भिक्षु राहात असत.

 या राजवाड्यास वज्रतुंडी दगडाचे १६०० खांब होते. प्रत्येक खांबामध्ये ६ फुटाचे अंतर राखून ४०|४० खांबांची एकएक रांग होती. सध्या जे अवशिष्ट खांब आहेत त्यांची उंची १२ फूट आहे. खांबांना ब्रांझ धातूच्या व तांब्याच्या पत्र्यांनी मढवून काढलेले होते. या ठिकाणी एकंदर १००० खोल्या होत्या.

 खालचा मजला जास्त उंच, त्याच्या वरचा कमी उंच अशी या राजवाड्याची रचना होती. वरच्या बाजूस भोवताली गच्ची असून वरील छपरावर ब्रांझ धातूचे पत्रे घातले होते. या राजवाड्यांत एक मुख्य दिवाणखाना होता तेथे दरबार भरत असे. त्याच्या खांबावर सोन्याचे पत्रे बसविले होते व छतही सोनेरी होते. येथील सिंहासन हस्तिदन्ति असून त्याचे पाय सिंहाच्या पायासारखे व सोनेरी होते.

 इ. स. च्या चौथ्या शतकांत या इमारतीचे दोन मजले कमी होऊन ती सात मजला झाली. महासेन राजा बुद्धधर्मद्वेष्टा असल्यामुळे या इमारतीचा त्याने नाश केला. या राजाने पुढे बुद्धधर्माचा स्वीकार केल्यावर पुन्हां पांच मजले बांधले. तत्कालिन बौद्धविहारापैकी हा विहार सर्वात मोठा होता, अनुराधपुराहून राजधानी दुसरीकडे गेल्यावर या मठाचे महत्व