पान:रोगजंतू.pdf/54

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

- ३ चिलटांचे जागेत रहाणे भाग पडते अशा वेळी काय करावें ?-ज्या वेळी काही अडचणीमुळे एखाद्याला अशा चिलटांच्या जागेत राहणे भाग पडते त्या वेळी रात्री निजतांना बिछान्याभोंवतीं मच्छरदाणी टाकून निजावें. होतां होई तो निजावयाची जागा सखल असूं नये; वरची असावी. मुंबईसारख्या शहरांत घरांच्या खालच्या जागेत अंधार असतो व अंधाराची जागा चिलटांना पसंत असते. यासाठी अशा लोकांनी हिवतापापासून दूर रहावयाचे असल्यास वर सांगितल्याप्रमाणे मच्छरदाणीचा उपयोग करावा. पुष्कळदां मच्छरदाणी बरोबर न लाविल्याने किंवा तिला चिलटे येण्याजोगी मोठी छिद्रे असल्याने चिलटें आंत येतात. यासाठी मच्छरदाणी लावणे ती चिलटें आंत येणार नाहीत अशा बेताची करावी. ज्यांना मच्छरदाणी विकत घेण्याची शक्ति नसेल त्यांनी निजण्यापूर्वी खोलीची सर्व दारे बंद करून तंबाखू , गंधक, धूप, कडुनिंब, साधे गवत, यांपैकी जे मिळण्यासारखे असेल त्याची धुरी करावी झणजे चिलटें मरतात किंवा तेथून पळून तरी जातात. चिलटें ही विशेषतः संध्याकाळचे प्रहरी काळोख पडूं लागला ह्मणजे भक्षशोधार्थ बाहेर निघतात व सकाळी उजेड पडूं लागला ह्मणजे घरांत किंवा कोणत्याही अंधाराच्या जागी येऊ लागतात. यासाठी त्या वेळी ती घरांत न येतील अशी तजवीज राखावी. तसेच घरांत बसण्याचे किंवा निजण्याचे जागी डोक्यावर पंख्याचा उपयोग करावा. यामुळे त्या जागी वारा जोराने खेळल्याने चिलटे पळून जातात. ह्मणूनच वान्याचे जागी चिलटें फारकरून रहात नाहीत. श्रीमंत असतील ते वर सां