पान:रोगजंतू.pdf/53

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

________________

४३ हिवतापाचे प्रकार. हिवतापाचे पुष्कळ प्रकार आहेत. त्यांतील मुख्य पुढीलप्रमाणे आहेत: १-एकांत्रा-अन्येद्युः हा ताप २४ तासांनी येतो. याला इंग्रजीत 'कोटीडियन' असें ह्मणतात. २-तिजारा, तिजांत्रा, पहिरा-तृतीयकः-हा ४८ तासांनी येतो. याला 'टर्शियन्' असें ह्मणतात. ____३-चौथरा-चातुर्थिकः-हा ७२ तासांनी येतो. याला 'क्वार्टन' असें ह्मणतात. ४-रोज एकसारखा काही दिवसपर्यंत येणारा किंवा मुदतीचाः-याला इंग्रजीत 'रेमिटंट' वगैरे नांवें आहेत. हे जे चार प्रकारचे ताप सांगितले, त्या प्रत्येकाचे जंत निर. निराळे असतात व ते वर सांगितल्याप्रमाणे आपापल्या ठरलेल्या मुदतींत ह्मणजे २४।४८१७२ तासांनी व ७।९।१४ दिवसांनी विभागण्यास किंवा फुटावयास लागतात. ह्मणून ज्या वेळी चिलटें एखाद्या माणसाचे रक्तांत या प्रकारांपैकी दोन, तीन किंवा चार जातींच्या तापांचे जंतू आणून सोडतात त्या वेळी प्रत्येक जंतची जसजशी विभागण्याची किंवा फुटावयाची वेळ असेल तसतसा अनियमित ताप भरतो ह्मणून अशा प्रकारच्या तापांत केव्हां केव्हां ताप भरून घाम येऊ लागला नाही तोच पनः र वाजू लागते. ताप भरतो, उतरतो, पुनः लगेच भरतो, अशी विलक्षण स्थिति होते आणि त्यासाठीच त्याची येण्याची वेळ. आरंभ, क्रिया ही अनियमित असल्यामुळे आपल्या आर्यवैद्यकी