पान:रूप पालटू शिक्षणाचे (Roop Paltu Shikshanache).pdf/६०

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 सध्या या साखरशाळा महाराष्ट्रात थेऊर, राहुरी, इचलकरंजी व सोलापूर येथील कारखान्यांच्या परिसरात चालविल्या जातात. त्यांपैकी थेऊर परिसरात सर्वात जास्त म्हणजे १५ शाळा चालविल्या जातात. या शाळांमध्ये शिक्षकांबरोबर प्रबोधक म्हणून ज्ञान प्रबोधिनी प्रशालेतील इ. आठवी, नववीचे विद्यार्थी गटागटाने जात असतात. विद्यार्थ्यांचे ४-४ चे गट केले जातात. प्रत्येक आठवड्याला २ गट एका पाठोपाठ एक पुण्यापासून २५ ते ३० कि.मी. अंतरावरील साखरशाळांमध्ये शिकविण्यासाठी जातात. सोमवारी सकाळी एक गट जातो तो गुरुवारी संध्याकाळी परत येतो तर दुसरा गट गुरुवारी सकाळी निघून शनिवारी रात्री परत येतो. गरजेप्रमाणे हा गट रविवारीही तिथे राहतो.
 शाळेचा दिनक्रम व प्रेरक-प्रबोधकांची जबाबदारी यांचा एकमेकांशी योग्य समन्वय ठेवून नियोजन केले जाते.

दिनक्रम प्रबोधकांची जबाबदारी
स. ७ ते ७.४५ प्रात:स्मरण, ६वा. उठून आवरणे, वस्तीवर

उपासना,व्यायाम विद्यार्थी गोळा करून उपासना, सूर्यनमस्कार व चेतना व्यायाम शिकवणे.

७.४५ ते ९.०० आंघोळ, परिसर ज्ञान जवळच्या टाकी वा नळकोंडाळ्यावर

मुलांना आंघोळ घालणे. (आठवड्यातून एकदा डेटॉलने) नंतर परिसरात फिरून माहिती देणे.

९.०० ते १०.०० न्याहरी व आवरणे
१०.०० ते १०.३० मुले गोळा करणे वस्तीत फिरून शाळेत

न आलेल्या मुलांना समजावून शाळेत आणणे.

१०.३० ते ११.३० परिपाठ-प्रार्थना मुलांनी शिस्तीने, शांततेने

वागावे यासाठी मदत करणे व स्वत:ही तसे वागणे.



(५४)रूप पालटू शिक्षणाचे