पान:रुपया.pdf/6

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



प्रकरण १ ले
पूर्वेतिहास

 हिंदुस्थानांत अति प्राचीन काळापासून सोन्याचे नाणे चालत होते, ही गोष्ट निर्विवाद आहे. १८३५सालीं रुपया हेच फक्त कायदेशीर फेडीचे नाणे आहे असे कंपनीने जाहीर केले व सोन्याचे नाणे बाजारभावाप्रमाणे खजिन्यांत घेतले जाईल असे आश्वासन दिले. १८५३ सालीं लॉर्ड डलहौसी यांनी सर्व सोन्याची नाणीं कंपनीचे मुलखांत बेकायदेशीर आहेत असे ठरविलें व रुपया हेंच फक्त चलनी नाणे मुकरर केले. नंतर १८६४ साली हिंदुस्थान सरकारने सोन्याचे नाणे येथे प्रचलित करण्याविषयीं स्टेट सेक्रेटरी यांस विनंति केली; परंतु ती अमान्य झाली; कारण एकचलनपद्धतीचा त्या वेळेस ब्रिटिश अर्थशास्त्रज्ञांवर पगडा बसलेला होता. १८६६ मध्ये एका कमिट्टीने हिंदुस्थानांत सोन्याचे नाणे हे फार लोकप्रिय आहे असे अहवालांत नमूद केले व सोन्याचे नाणे प्रचलित करण्याची शिफारस केली. अनेक फडणिसांची मतेही या सूचनेस अनुकूल होतीं ; विशेषतः सर रिचर्ड टेंपल यांनी या मताचा अतिशय जोराने पुरस्कार केला होता. १८७६ साली इंग्लिश व्यापाऱ्याणे रुप्याचे