पान:रुपया.pdf/58

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




[ ५५ ]
( हे आंकडे लक्षांचे आहेत.)

 4 एकंदर चलनांतून सरकारी खजिन्यांत ज्या नोटा आहेत त्या वजा केल्या म्हणजे ‘लोकांजवळ' हा आंकडा निघतो.

 यावरून १९०३ नंतर नोटांचे चलन कसे वाढत चालले आहे हे दिसून येईल. या नोटांचे रुपये देण्याकरितां जे नियम आहेत, ते असे. १८९० पर्यंत सिक्यूरिटींची संख्या ६ कोटि ठरविलेली होती. १८९१ मध्ये ही मर्यादा ७ कोटींपर्यंत ढकलली ; १८९२ मध्ये ८ कोटि झाली ; १८९७ मध्ये १० कोटि झाली व १९०५ मध्ये १२ कोटि झाली. याचा अर्थ असा की, १२ कोटींपर्यंतच्या नोटा व्यापारास अत्यावश्यक असल्यामुळे, या नोटांचे पैसे कोणीही मागणार नाहीं; म्हणून त्यांच्याऐवजी रुपये ठेवण्याचे कारण नाहीं. १९११ मध्ये ही मर्यादा १४ कोटींपर्यंत नेली. या सिक्यूरिटींचे जे व्याज मिळते, ते कागदी चलनाचा नफा' या सदराखाली एकंदर जमेत सामील केले जाते.

 १८९८ पर्यंत या मर्यादेपेक्षा अधिक ज्या नोटा होत्या, त्यांबद्दल रुपये ठेवीत असत. नंतर सोन्याचे चलन प्रचलित झाल्यामुळे कांहीं भाग पौंडांच्या रूपाने ठेवू लागले. १९०० मध्ये यापैकीं कांहीं भाग लंडनमध्ये ठेवण्याची परवानगी कायद्याने दिली. १९०५ मध्ये हिंदुस्थान किंचा इंग्लंड यांपैकी कोणत्याही स्थानी हा निधि ठेवावा अशी कायद्यानें सवलत करून घेतली.