पान:रुपया.pdf/4

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



( २ )

 देशांतील व्यापारधंदा व इतर सर्व वस्तुविनिमय हीं चलताच्या चांगले वाईटपणावर फार अवलंबून असतात. सदोष असल्यास, संपत्तीच्या उत्पादनावर व व्यापारावर अनिष्ट परिणाम होतो. हल्लीची पद्धति ही अशा तऱ्हेची म्हणजे सदोष आहे असे बहुतेक भारतीय अर्थशास्त्रज्ञांचे मत आहे. याकरिता ह्या पद्धतीची रचना काय आहे व इच्यांत कोणते दोष हे प्रस्तुत पुस्तकांत दाखविले आहे. शिवाय गेल्या दोन चार वर्षात सरकारने ‘ उलट हुंड्या' विकल्यापासून व त्यामुळे उत्पन्न झालेल्या तीव्र वादापासून या विषयास विशेष महत्व आलेले आहे. अशा हल्लींच्या जिज्ञासेच्या प्रसंगीं चलनाचे विवेचन लोक विशेष उत्सुकतेने ग्रहण करतील अशा दृष्टीने हा विषय प्रथम हाती घेतला आहे.

 यापुढे बँकिंग' अंतरराष्ट्रीय हुंडा बळ [ Foreign Exchange ], राष्ट्रांचा जमाखर्च व अंदाजपत्रके [Public Fiance ] इत्यादि क्लिष्ट विषय सुगम करण्याचा विचार निव्वळ द्रव्यार्जनाकरितां हे पुस्तक लिहिलेले नाहीं; तथापि द्रव्यार्जन झाल्यास, पुढील कार्य करण्यास जास्त उत्साह येईल हे प्रांजलपणे कबूल केले पाहिजे, अलमतिविस्तरेण ।

वा. ना. गो.

वि. ह. घो.