पान:रुपया.pdf/244

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४१ )

लागल्या आहेत त्या सोन्याची टंचाई झाल्यास अनायसे कमी होऊन महर्घतेच्या सर्व दुःखांपासून हे देश मुक्त होतील दुसरे उत्तर असे आहे की सर्वांगसुंदर असे सुवर्णसंलमचलन यूरोपांतील देशानी अमलांत आणावें ह्मणजे सोने मुळींच चलनांत नसतां सुबर्णचलन करण्याची अप्रतिम युक्ति जी आजपर्यंत हिंदुस्थानास शिकविली जात आहे तिचा त्यानां प्रत्यक्ष अनुभव घेण्यास सांप- डेल. यूरोपांतील देशांनी आपले सुवर्णनिधि युनायटेड स्टेट्समध्ये ठेवून आपले सर्व व्यवहार त्या निधींचे मार्फत चालवावे. फिडले शिरस यांच्या मताने सुवर्णचलनापेक्षां सुवर्णसंलग्नचलन है श्रेयस्कर आहे. हे खरे असल्यास इंग्लंड फ्रान्स जर्मनी इत्यादि देशांनी है चलन स्वीकारण्यास कालावधि लावू नये हैं बरें.
 एकंदर विचार करत हिंदुस्थानांतील चलनपद्धति आत्यंतिक ( final ) आहे असे ह्मणतां येणार ताहीं. परवांच सर विठ्ठलदास यांनी असेंब्लीमध्ये याविषयी उहापोह करण्याकरितां एक कमिटी नेमण्याविषयीं ठराव पुढे आणला होता. तो जरी पास झाला नाहीं तरी हिंदुस्थानांतील सर्व शास्त्रज्ञांचें सुवर्णचलनाविषयीं अतिशय ठाम असे अनुकूल मत असल्यामुळे हा प्रश्न लवकरच पुन्हां उष- स्थित होईल त्यावेळी सर्व लोकनियुक्त सभासदांनी आपले मत स्पष्टपणे जाहीर केल्यास ह्या प्रश्नाचा कायमचा निकाल लागेल अशी आशा करणे व्यर्थ होणार नाही.