पान:रुपया.pdf/243

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( २४० )

 १९१५ सालंचे उत्पादन १४९ कोटि रुपयांचे होते. असे असतां हिंदुस्थानांत ४०-५० कोटींचें सोनें आल्यास सोन्याची टंचाई पडेल असे ह्मणतां येत नाही. शिवाय हिंदुस्थानांत बँकिं गची पद्धत रूढ झाल्यावर दर वर्षी इतकें सोने लागणार नीहा, सोन्याची काटकसर करण्याचा प्रयत्न जसा यूरोपांत केला जातो तसा हिंदुस्थानांत केल्यास येथेही नोटा व चेक यांचे आधारें व्यवहार होऊन थोडें सोने पुरेस होईल. प्रत्येक जिल्ह्यांत इंपीरियल बँकेची शाखा काढिल्यास जिल्ह्यांतील व्यवहारांतमुद्धां नोटांचें चलन वाढून नाण्याचे महत्व कमी होईल. असा प्रयत्न आजपर्यंत कोणीही केलेला नाही. असे असतां हिंदुस्थान मागसलेला देश आहे हें पालुपद घोकीत बसण्यांत तात्पर्य काय? आमच्या मत हलींचें रुपयांचे चलन अदमास ३२५ कोटि रुपयांचें आहे त्य.- पैकी १२५ कोटि चलन उपनाणें ह्मणून ठेवून बाकीच्या २०० कोटि रुपयांऐवजी अदमास २० कोटि पौंड चलनांत आणल्यास सर्व व्यवहार उत्तम रीतीने चालेल. याशिवाय जास्त चलन लाग- ल्यास त्याची जबाबदारी सरकारावर नसून लोकांवर आहे. अधिक नागे लागल्यास लोकांनी सोनं आणून ते पाडून न्यावे; खुली टांकसाळ ठेवणे एवढेच सरकारचे कर्तव्य आहे.
 उलटपक्षीं यूरोपांतील देशांचा एक प्रकारें फायदाच होईल. गेलीं बीस वर्षे सोन्याच्या विपुलत्वामुळे यूरोपांत किंमती वाढू