पान:रुपया.pdf/199

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९६ )

देशी धंद्यांना उत्तेजन देण्याचा यांचा स्तुत्य हेतु होता व ह्मणून गिरण्यामध्ये बगैरे यांनी बँकेचें बरेंच भांडवल गुंतविलें. वास्त- विक स्वतंत्र औद्योगिक बँका काढून दीर्घकालीन मुदतीच्या ठेवी घेतल्याशिवाय साध्या बँकांनी अशा तऱ्हेच्या विलंबानें नफा मिळ णाऱ्या धंद्यांत पैसे गुंतविणं चुकीचे होतें हैं खरें, तथापि थोडीशी मदत मिळाली असती तर ही बँक तगून राहिली असती; परंतु या वेळचे वातावरण निराळें असल्यामुळे, मदतीची गोष्ट दूरच राहिली व बँकेचें दिवाळें वाजले. यानंतर जो तो आपापले पैसे बँकेतून काढून घेऊं लागला व त्याचा परिणाम सर्व बँकांस भोंवला. यांमध्ये इंडियन स्पिशी बँक ही फार महत्वाची व मोठी अशी बँक होती. इचें भांडवल पाऊण कोटीचें होतें व ठेवी पावणेतीन कोटींच्या होत्या. हिच्या दिवाळ्यासंबंधी हकीकत बहुतेकांस माहित आहेच; पण ही बँक अतिशय उत्तम तऱ्हेनें चाललेल्या बँकांपैकी होती, एवढे मात्र खरें. या लाटेंत १९१३-१४ या एक वर्षांत १॥ कोटी भांडवलाच्या एकंदर ५४ बँकांचे दिवाळे निघालें. दिवाळी निघाल्यापैकीं कांहीं महत्वाच्या बँकांसंबंधी खालीं आंकडे दिले आहेत

भां वल. रिझर्व. ठेवी.

-  इंडियन स्पिशी बँक ७५

पीपल्स बँक ऑफ इंडिया क्रेडिट बँक ऑफ इंडिया १० १२ १५ २ २७७. १२७. ५१