पान:रुपया.pdf/198

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
( १९५ )

 हिंदुस्थानांत आज लहानमोठ्या अशा "जाइन्ट स्टॉक" ( समाईक भांडवलवाला) बँका एकंदर ८८ आहेत व त्यांच्या शाखा २०० आहेत. यांच्यामध्ये ५ लक्ष किंवा जास्त भांड- बलाच्या व ५ लक्षांखालील भांडवलाच्या असे दोन वर्ग सरकारी खात्यांत केलेले आहेत व तिसरा एक वर्ग एक लक्ष किंवा त्याच्या खालील भांडवलवाल्यांचा करितां येईल यापैकी पहिल्या वर्गांत मोडणान्यांची संख्या फक्त १८ आहे दुसऱ्या व तिसया वर्गां- तील कांही बँकांचे व्यवहार जरी व्यवस्थेशीर चालत असले, तरी डळमळीत पायावर उभारणी झालेल्यांचेंच संख्याधिक्य एकंदरीत त्या वर्गांत दिसून येतें व त्या मृगनक्षत्रांत उत्पन्न होणाऱ्या किड्यांप्रमाणे कांहीं नवीन स्थापन होत असतात तर कांहीं लयास जात असतात. १९१३ सालापर्यंत हिंदुस्थानांत व विशेषतः पंजावांत बँकांचें पीक जोरांत होते. परंतु कित्येकांचे बाबतीत डायरेक्टर, मॅनेजर वगैरे लोकांस अनुभव कमी असल्यामुळे व कित्येकांच्या बाबतींत त्यांच्या लवाडीमुळे जी बँका बुडण्यास सुरु- बात झाली, ती बऱ्याच नांवाजलेल्या अशा बँकांनादेखील भोंवली . पहिल्या प्रथम नोव्हेंबर १९१३ मध्ये लाहोरची पीपल्स बँक ही लिक्विडेशनमध्ये गेली. हिचें जमा झालेलं भांडवल १२॥ लक्ष असून, ही १९०१ मध्ये स्थापन झाली होती. हिच्या ठेवी सव्वा कोटीच्या होत्या व पंजाब सरकारचे हल्लींचे मंत्री लाला हरार्कसन हे तिचे उत्पादक होते. जर्मन बँकांचे अनुकरण करून