पान:रुपया.pdf/127

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १२४ ]

नवीन रुपये पाडण्याचं बंद करून सोन्याचें नाणे सुरू करावें सुवर्णचलन स्थापित झाले ह्मणजे निधि, हुंडणावळ, कौन्सिलविले, वगैरे सर्व ' पदार्थी ' चा आपोआप अत्यंताभाव होईल.
 आतां नेहमींची ‘शेख शिल्लक' हा एक एकंदर सरकारी खजिन्याचा महत्वाचा भाग असल्यामुळे त्याविषयी विचार करूं. या शिलकेचा बराचसा भाग लंडनमध्ये ठेवून तो तेथील व्यापा- ग्यांस कर्जाऊ देऊं लागले, त्यामुळे याविषयी हिंदुस्थानांत व इंग्लंडांत वर्तमानपत्रांतून बरीच टीका सुरू झाली. सरकारच्या बाजूनें या विषयींचें समर्थन असे आहे कीं, ही शिल्लक नेहमी ठेवण्याचा विचार नसून, कांहीं आगंतुक कारणांनी ती जमलेली आहे. हे पुष्कळ अंशीं खरे आहे. एकंदर ७० कोटि रुप- यांचा निधि पुरें आहे असे वर दाखविलेंच आहे. याशिवाय जास्त पैसे इंग्लंडांत आल्यास ते पुनः हिंदुस्थानांतील रोख शिल कींत जमा केले पाहिजेत हें तत्व सरकारने मान्य केले पाहिजे. हल्लींची स्थिति अशी आहे कीं, एक तर पुष्कळशी शिल्लक हिंदु- स्थानांत जमून ती विनव्याजी पडून राहते किंवा ती इंग्लंडांतील शिलकेंत जमा करून व्याजाने तेथील व्यापायांस देतात; परंतु याला आय अगदी साधा आहे. हिंदुस्थानांतील शिल्लक हल्लींच्या कायद्याप्रमाणे लोकांस देतां नाहीं, ह्मणून हा कायदा बदलून टाकून रोख रुपये दिल्याशिवाय लोकांस खजिन्यांतील नोटा कर्जाऊ देण्याची नवीन कायद्यानें व्यवस्था करावी. इंपी-