पान:रुपया.pdf/125

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
[ १२२ ]

प्रतिकूल झाली ह्मणजे लोकांस हैं सोनं देण्यास काढल्यास, फक्त बँकांसच द्यावे व त्यांपासून ते देशाच्या बाहेर पाठविण्या संबंधानें करार लिहून घ्यावा. खाजगी व्यक्तींना पौंड देऊं लाग- ल्यास, ते इतस्ततः पसरले जाऊन त्यांचा हुंडणावळीकरितां उप- योग न होतां, वितळण्याकडे, दागिने करण्याकडे अथवा संचय करण्याकडे उपयोग होतो.
 आतां हा सर्व सोन्याचा निधि लंडनमध्ये असावा किंवा हिंदु- स्थानामध्ये असावा ? भारतवासी तज्ज्ञांचें मत अर्थातच असे आहे की, हा निधि हिंदुस्थानांत असावा इंग्लंडमध्ये असण्यांत असा फायदा आहे की, आंतरराष्ट्रीय देणें देण्याचे असल्यास, या निधीच्या आधारावर इंग्लंडांत तें फेडून टाकतां येतें; परंतु यावर त्यांचं उत्तर असें आहे कीं, दहा वर्षांत एकदां आंतरराष्ट्रीय देण्यामुळे संकट येतें. तेवढ्याकरितां हा निधि दहा वर्षे इंग्लंडमध्ये ठेवण्याचं प्रयोजन नाहीं. हा सर्व निधि येथें ठेविल्यास त्यावद्दल इंग्लंडांत जेवढे व्याज मिळतें त्यापेक्षा जास्त व्याज येथे मिळेल व हिंदु- स्थानांतील व्यापारास या रकमेचा अंशतः तरी फायदा मिळेल. यद्यपि कांहीं निधीचा भाग इंग्लंडमध्ये असावा असे मानलें तरी- ही निदान निम्मे भाग तरी हिंदुस्थानांत असावा.फार झाले तर एवढेच होईल कीं, दहा बारा वर्षांनी एकदां सोनें अथवा पौंड इंग्लंडांत पाठवावे लागतील व त्याबद्दलचा पाठविण्याचा खर्च हिंदुस्थानास सोसावा लागेल.