पान:रुपक.pdf/४५

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे




प्रवेश चौथा

(स्थळ तेच. रूपा निघून गेल्याने बापूला धक्का बसलाय. तो डिप्रेसडू आणि
नर्व्हस मूडमध्ये आहे. लता त्याला सांभाळून घेते आहे. रूपाच्या रूममध्ये बापू
आवराआवर - साफसफाई करतोय.)
बापू: सगळं नीट आवरायला पाहिजे. पोरीला वेळ मिळत नव्हता.
लता: बापू, बापू 5 कुठं आहेस ? ती ही रूपाच्या रूममध्ये येत. अरे,
 काय करतोयस ?
बापू: अग आवरून नको का ठेवायला सगळं. पसारा कितीय ?
लता : कुठं पसारा आहे ? चल तू बाहेर .
बापू: थांब मला व्यवस्थित ठेवू दे सगळं. (तो खोली पुन्हा लावायला लागतो.)
लता: असं काय करतो बापू, काल तूच तर आवरली होतीस ना रूम !
बापू: रूपाची खोली म्हण. ही 'रूपाची खोली' आहे. तुला आठवतंय,
 लग्न झालं तेव्हा आपण गावाकडं पहिल्यांदा गेलो होतो. तिथं होतं
 प्रत्येक खोलीवर लिहिलेलं...
लता: हो. देवाची खोली -
बापू: देवाची खोली नव्हती, देवघर म्हण. हॅ: म्हणजे तुला काहीच
 आठवत नाहीये. उगीच हो हो म्हणतीयस.
लता: नाही रे आठवतंय ना. दादांची खोली, अप्पूघर आणि ती कोठीची
 खोली. कोठीची खोली म्हणजे काय, असं मी विचारलं होतं तुला ?
बापू: हं, आत्ता आठवतंय तुला. कोठीची खोली म्हणजे अन्न धान्याची
 खोली. सगळं तिथं साठवून ठेवलेलं असायचं.
लता: आणि अप्पांनी स्वत:च्या खोलीला 'अप्पूघर' असं नावं दिलं होतं.
बापू : तशी ही रूपाची खोली.
लता : (विषय बदलत) तुला ती गावाकडची तानूताई आणि पखालबुवा
 आठवतो का रे ?
बापू : तानूताई ? हां. तिला अटक केली होती.
लता: बघ ना. तीन-चार महिन्याच्या नातवाशी झेलाझेली खेळायला लागली.
बापू: घरात नवं कुणी येणं हा आनंदाचाच भाग असतो. त्यामुळं तर
 जगण्यात उत्साह येतो.

रुपक । ४५ ।