पान:रुपक.pdf/२७

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे



रूपा : म्हणजे ?
बापू :म्हणजे त्यानं ते बदलून घेतलं होतं. 'कोसला' कादंबरी वाचून !
लता : आमच्याकडं 'फ्रेंडी' आडनावाचा माणूस होता. त्याचंही असंच होतं !
रूपा : माणसं असं का करतात कुणास ठाऊक !
बापू : पूर्वी टोळ्या असत अरण्यात. एका टोळीचं दुसऱ्या टोळीशी जमत
 नसे. तसंच आता माणसांच्या टोळ्या व्हायला लागल्यात. आपली
 टोळी कशी संघटित आहे ते दाखवायचं, तोडफोड करायची,
 दुसऱ्याला त्रास द्यायचा आणि हवं ते पदरात पाडून घ्यायचं.
रूपा : हा तर रानटीपणा झाला.
बापू : तेच रानटीपण पुन्हा उगवून आलंय.
रूपा : त्या जॉनीचंही असंच झालं.
लता : अग हो, त्याची गंमत राहिलीच की.
रूपा : ऐक ना. सकाळी एक धोतर घातलेला राठ माणूस आला कंपनीत.
  आमच्या विभागात येऊन 'मल्हारी आहे का', म्हणून विचारू
 लागला. मला काय माहित, मी 'आमच्याकडं कुणी मल्हारी
 नाही' म्हणून सांगितलं. तेवढ्यात जॉनी पळत आला. त्या माणसानं
 'ह्यो काय मल्हारी', असं मला म्हटलं आणि जॉनीनं त्याला पुढं बोलू
 न देता पटकन बाहेर नेलं. जॉनीचं नाव मल्हारी आहे
 हे आम्हाला त्यामुळं कळलं.
बापू : मल्हारीपेक्षा जॉनी नाव फॅशनेबल वाटलं त्याला.
रूपा : गंमत पुढेच आहे. आम्ही जॉनीला विचारलं की तो कोण आहे, तर
  म्हणाला, 'गडी आहे आमच्या फार्मवरचा. आणि खरंच त्याची
 प्रोफाईल इतकी परफेक्ट होती. त्याचं रांगडेपण दिसून येत होतंच.
 बट आय एम सॉरी टु से, दॅट मॅन वॉज हिज फादर ! आपल्या
 वडलांनाच तो चक्क फार्मवरचा गडी म्हणाला. सो सॅड !
लता : तुमच्या मॉडर्न जगात त्याला त्याचा बाप ऑड वाटला. तुम्ही टिंगल
 कराल त्याची असं वाटलं त्याला.
रूपा : नाही तरी मल्हारी नाव किती कॅची आहे जॉनीपेक्षा. व्हेरी पिटी.
बापू : आपल्या नावातला गोडवा कळला पाहिजे. आता रात्रू हे नाव
लता : राघू नाव किती तरी गोड आहे.

रुपक । २७ ।