पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७९

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 सर्वांनी आचारावयाच्या, जीवनाला सकारात्मक आकार देणाऱ्या कृतींचा आलेख म्हणजे संस्कार. असे म्हणणे फारसे वावगे होऊ नये. 'सं' या शब्दातच समूहभावना आहे. समूहाने करावयाच्या कृती सर्वांना सुखाच्या, भाग्याच्या, प्रकाशाच्या दिशेने नेणाऱ्या असाव्यात. समाज ही संकल्पना समूहात्मक आहे. समूहात राहणाऱ्यांनी असे वागावे की एकाच्या कृतीचा इतरांना उपद्रव होऊ नये. संघटनात शक्ती असते. ती नेहमी संतुलित रहावी. संपूर्ण समाजात शांती आणि समृद्धी नांदावी अशा तऱ्हेचे व्यक्तीने करावयाचे आचरण आणि अशा आचराणाचे धडे देणे म्हणजे संस्कार. असे संस्कार करणारी तीन महत्त्वाची माध्यमे म्हणजे आई, शिक्षक आणि कुटुंब. व्यक्तीची पहिली शिक्षिका आईच असते. भवतालच्या निसर्गाची ओळख करून देणारी, काऊ, चिऊ, उंदिरमामा आदींच्या गोष्टीतून समाजात कसे वागावे, कसे वावरावे याची ओळख करून देणारी असते आई. कुटुंबातील व्यक्ती म्हणजे आजी, आजोबा, काक, काकू, वडील, आत्या, भावंडे वगैरे. त्यांची एकमेकांशी वागण्याची पद्धत यांतून घरातील मुलांवर समाजात कसे वागावे, कुटुंगात कसे वागावे याबाबत अलिखित नियमांचे संस्कार होत असतात. शाळेतील शिक्षकाची भूमिका अत्यन्त महत्त्वाची असते. माणूस आणि निसर्ग यांच्यातील नेमके नाते कोणते, मुलांसमोर उलगडून ठेवण्याचे, कोणत्याही घटनेमागील कारण शोधण्यासाठी विद्यार्थ्याला प्रवृत्त

रुणझुणत्या पाखरा / ६५