पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७७

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 "दादी, मंगेशच्या आजी आल्या होत्या ना? त्या काकीला म्हणत होत्या. तुझ्या धाकट्या जावेच्या मुली चित्रासारख्या देखण्या आहेत. पण शेवटी चांभारणीच्या पोरी. लग्न कशी व्हायची. तू आपली वेगळी रहा. पोरं मोठी व्हायच्या आत काय ते ठरवा."
 शरू हे माझ्या वाढणाऱ्या नातवंडांचे प्रश्न. घरात कुरबुरींचा पाढा. आपण चाळिसबेचाळिस वर्षापूर्वी 'जातपातके बंधन तोडो' चा नारा देत विवाह केला. अरूणचे 'माळीपण' तुला कधी बोचलं नाही. तुझ्या मुलांना बोचलं नसेल; पण नातवंड?"
 "नीलू, घरात देवघर नसलं तरी सकाळी अंघोळ केल्यावर मी समई लावून मुलांना श्लोक म्हणायला शिकवी. अगदी 'सं गच्छध्वं संवदध्वं' सर्व जण एकमेकांची मनं जाणून घेऊ, एका विचाराने राहूया ही वेदातली प्रार्थना ते 'असतो मा सद्गमय... पासून ते मृत्योर्मा अमृत गमय' पर्यन्त ! 'अमृत' चा अर्थ सांगतांना अरूण मुलांना सांगे की असे काम करा जे अनेकांना उपयोगी होईल. सानेगुरूजी, रविन्द्रनाथ टागोर आपल्यात नसले तरी त्यांचे विचार अमर म्हणजेच चिरंतन आहेत ना? म्हणजेच ते मृत नाहीत 'अमृत' आहेत. संध्याकाळी 'शुभंकरोती' होई. तीच सवय नातवंडांनाही दिली. एकदा शैलूचा मोठा विचारत होता 'आजी आपण माळी आहोत का? गरूजी म्हाणाले माळी जात ओबीसीत येते. त्यांना सरकारकडून फी व कपडे पुस्तकांसाठी पैसे मिळतात. आम्ही अर्ज करू?' प्रश्न मला अस्वस्थ करून गेला. शरू सांगू लागली. पण लगेच उत्तर सुचले. "साहिल तुझा बाबा डॉक्टर आहे. आई त्याला मदत करते. तुम्हाला पुस्तके छान कपडे, खेळणी सगळं मिळतं ना? मग कशाला आपण अर्ज करायचा? आणि हे बघ बाळ जन्माला येतं तेव्हा त्याची जात हाता कपाळावर लिहिलेली असते का? बेटा आपण माणूस आहोत. माणसाचे रंग वेगळे असले तरी ती माणसंच असतात ना? आपण प्राणी नाही. हजारो वर्षापूर्वी माणसांनी माणसांच्या उद्योग... व्यवसायावरून जाती तयार केल्या. पण आपण माणसंच. महाराष्ट्रात राहतो म्हणून मराठी. मोहन दादूचे वडील गुजराथ प्रान्तात होते म्हणून गुजराथी, कळले? असे सांगताच त्याला पटले नि पळाला खेळायला" शरयू सांगत होती.
 "नीलू तुझ्या मुलांचे व्यवसाय वेगळे. मुलासुनांनाही त्यांची स्वप्नं असतात. घराच्या, दैनंदिन जगण्याच्या त्यांच्या म्हणून कल्पना असतात. कळत नकळत मोठ्यांचं त्यांना दडपण वाटतं. मुलांना सुनांना एकत्र बोलाव. नाहीतरी प्रत्येकाच्या वेगळ्या मोठ्या खोल्या आहेत. मुलांची स्टडी-अभ्यासाची खोली गच्चीत तुम्हीच बांधून द्या, मुलांना प्रेमाने वेगळे राहू द्या. उद्या ती घरंही बांधतील." शरू सांगू लागली.

रुणझुणत्या पाखरा / ६३