पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/७५

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.



 "शरे, वादविवाद स्पर्धेत एकत्र कुटुंब पद्धतीच कशी श्रेष्ठ आहे. वृद्ध आणि लहान मुलांना सुरक्षितता दिलासा देणारी आहे हे विविध दाखले देऊन पटवून देणारी तू. वक्तृत्व आणि वादविवाद स्पर्धेत सतत जिंकणारी तू. आणि आता. अरूण सत्तरीला टेकलाय. तू पासष्टी पार केलीस. आपल्या काळात 'हम दो हमारे दा' चा नारा नव्हता, त्रिकोणाची रित होती. तू तर दोन मुलानंतरच पूर्ण विरामाची इच्छा व्यक्त केलीस अरूणने मात्र लेकीशिवाय पूर्णत्व नाही हा हट्ट धरला. तो पूर्ण झाला. तुझी धाकटी नीरासुद्धा पस्तिशीची आहे. शैलेश, नवीन गावातच रहातात. पण तरीही तू नि अरूण एवढ्या मोठ्या घरात दोघेच का रहाता?"
 नीलाने आपल्या मनातली खळखळ शरयुजवळ भडाभडा मोकळी केली. शरयूला ही गोष्ट तशी नवी नव्हती. तिच्या आणि अरूणच्या अनेक मित्र मैत्रिणींना हा प्रश्न सलत असे.
 "नीले, चार दिवसांपूर्वी तुझा फोन आला. की तुझ्या मनात खूप... खूप साठलंय. ते मोकळं करायला आलीस ना? मग आधी तू बोलती हो. तुला आवडणारी हळद मिठाची मऊ खिचडी कुकरमध्ये लावते. मधला नवीन माडीवर रहातो. तिला बाजरीच्या तीन भाकरी, वरून तीळ लावलेल्या... आणि वांग्याचं भरित आणायला सांगितलंय, शैलेशचा दवाखाना जवळच आहे. त्याने गेल्यावर्षी घर बांधलय त्याची पत्नी अनिता फिजिओथेरपिस्ट आहे. तिने कालच लोणचं पाठवलंय. आणि ती

रुणझुणत्या पाखरा / ६१