पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/६३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

 ...२८ जानेवारी १९९५ च्या सकाळी बंगलोर येथील टाटा विज्ञान भवनात 'जनसुनवाईला, ...लोकन्यायसभेला सुरवात झाली. आशिया पॅसिफिक परिसरातील स्त्रियांचे ज्वलंत प्रश्न त्यात मांडले गेले. उद्घाटनासाठी ना मंत्र्यांचा सुळसुळाट ना त्यांच्या आगेमागे फिरणाऱ्या पुढारी अधिकाऱ्यांची पळापळ, स्त्रीप्रश्नांवर कृतीशील कार्यक्रम राबवणाऱ्या संघटनांच्या प्रतिनिधींनी, मध्यात ठेवलेल्या समयीची एकेक वात पेटवली. ती पेटवतांना एका वाक्यात त्या त्या देशातल्या महत्वाच्या स्त्री प्रश्नांनी ओळख करून दिली. सर्व प्रश्न एकत्र येऊन सोडविण्याचा सांघिक-निर्णय. एकीमेकींनी हातात हात घेऊन, हातांची पकड घट्ट करून निश्चय केला.
 व्यक्त होणाऱ्या व्यथा वेदनांची गाथा सुजाणपणे ऐकून, त्यांना न्याय व लढण्याचे बळ देण्यासाठी पंच म्हणून, विविध देशातील मान्यवर कृतीशील व्यक्तीं 'हाजीर' होत्या. सामाजिक न्यायाची बांधिलकी ज्यांच्या कृतीतून सतत जाणवली ते भारताच्या उच्च न्यायालयाचे माजी न्यायाधीश श्री. कृष्णा अय्यर, स्त्रियांच्याच नव्हे तर सामान्यांच्या प्रश्नांवर स्पष्ट भूमिका घेणाऱ्या झुंजार वकील ॲड. इंदिरा जयसिंग, दिल्लीचे प्रा. आशिष नंदी, या भारतीयांसोबत फिलिपिनच्या सुप्रसिद्ध ग्रॅब्रियेला स्त्री संघटनेच्या रचनाकार निलिआ सॅचो, चीनच्या महिला संघटनेच्या प्रमुख बाई विलान होत्या. व्यवसायाने

रुणझुणत्या पाखरा / ४९