पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/५४

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

टप्पे होते. शोधन कधी पूर्ण होत नाही. चिमुटभर ओंजळीत येते असे वाटते तोवर नवी दिशा खुणावू लागते. आणि तसेच झाले. दिशा उजळत गेल्या. 'हिंदु' ही जीवनदृष्टी आहे. गुरुवर्य मांडेसरांची लाडकी भूमिका. त्यादृष्टीने विविध विचारधारांना या नऊ दर्शनांना विकसित होण्यास अवकाश दिला. इरावतीबाई कर्व्यांनी Theory of Agglomeration मांडली. स्वीकार आणि समन्वयाचा सिद्धांत मांडला. आणि ती भूमिका हिंदू जीवनदृष्टीचा मध्यबिंदु आहे. या दृष्टीने चार्वाक दर्शनालाही अवकाश प्राप्त करून दिला. परंतु नंतरच्या वैदिक हिंदू धर्माची मांडणी करणाऱ्यांनी चार्वाक दर्शन नष्ट केले. चार्वाकास जाळून टाकले.

चार्वाक दर्शनाने सांगितले-
स्वातंत्र्यं मोक्षः, पारतंत्र्यं बन्धः

 सर्वश्रेष्ठ ईप्सित म्हणजे मोक्ष असेल तर स्वातंत्र्य हा मोक्ष आहे. आणि पारतंत्र्य हे बंधन आहे.

कृषिगोरक्ष्यवणिज्यदण्डनित्यादिभिर्बुधैः।
एवैरेव सदोपार्येर्भॊगान् अनुभवेद् भुविः।।

 ... शेती, गोपालन, व्यापार, नोकरी इत्यादी सदुपायांनी अर्थार्जन करून शहाण्यांनी सुख उपभोगावे.
 मुख आदि अवयवांचेक शरीरात सारखेच महत्व असते. मग वर्णभेद मानणे अयोग्यच.

वर्णक्रमः कीदृशः।
इतकेच नाही तर,
पतिव्रत्यादिसङकेतः बुद्धिदुबलैः कृतः।।

 पतिव्रत्यादि संकेत हे अत्यंत बुद्धिहीन पुरूषांनी निर्माण केले आहेत.
 मानवी मूल्यांची कदर, सामाजिक न्यायावरचा विश्वास चार्वाकांनी आम्हाला दिला.
 डेल रीप या अभ्यासकाने 'द नॅचरॅलिस्टिक ट्रॅडिशन इन इंडिया' या ग्रंथात म्हटले आहे.
 'It may be said from the available material that Charvaka holds truth, integrity, consistency and freedom of thought in the highest esteem.'

४० / रुणझुणत्या पाखरा