पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/२३

विकिस्रोत कडून
हे पान प्रमाणित केलेले आहे.

व्यवसाय सोडला होता. अशा देहविक्रय करणाऱ्या स्त्रियांना स्वत:च्या जगण्याचे भान देण्याचे काम त्यांच्यात जाऊन ती करू लागली होती. गप्पा मारतांना माझ्यासमोर एक प्रश्न तिने फेकला होता.
 "ताई तुमी कालिजात शिकविता. तुमचं पोट, घर चालविता. आमच्यासारख्या गरिबाच्या घरात जलमलेल्या पोरींना ना शिकशन ना काही. तुमच्यासारख्या हापिसात जाणाऱ्या बाया त्यांचचं डोकं इकतात नि पैसे कमवतात. आमच्यापैकी काहींजवळ असतं सुंदर शरीर, त्यातून जवान वय. मंग आमी त्ये इकतो नि पोरा-बाळांचं, आईबापाचं पोट भरतो. फरक काय? काही तरी इकायचं नि पैसे मिळवायचे! त्यातून आपल्यात पोरग्यांसाठी नवस बोलून पोरी देवीला वाहतात. अशा पोरींना साळंत कोण घालणार?'

रुणझुणत्या पाखरा/९