पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१७३

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आजही अंगणात रांगोळी काढून देवीचे स्वागत करताना गृहिणी गुणगुणते

साजिरे अंगण, शेणाने सारविले ।
वर रेखिते मी रंगावली ॥
घरी ये ग योगेश्वरी ।
तुझ्या सोन्याची पावली ॥
भांग भरते मोत्यानं; कुंकू कपाळी भरते ।
नव्या धानाचे तुरे मी, तुझ्या तोरणा बांधते ||


रुणझुणत्या पाखरा / १५९