पान:रुणझुणत्या पाखरा.pdf/१४०

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 १०/१२ वर्षांपूर्वीचा प्रसंग. व्याख्यानाच्या निमित्ताने गोव्याला जाण्याचा योग आला. गोव्यातील छोट्या गावांतून फिरतांना लक्षात आले एखाद्या विशाल झाडाच्या तळाशी मारूतीचे चिमुकले अर्धगोलाकार देऊळ असावे तशी अनेक अर्धगोलाकृती देवळे दिसली. संध्याकाळी तिथे कोणीतरी दिवा चेतवून जाई. माझी उत्सुकता उंचावली. जवळ जाऊन पाहिले तर तिथे शेंदूर फासलेल्या दगडा ऐवजी चिमुकला क्रूस होता...
 दुर्गेच्या मंदिरातला पुजारी समाजवादी विचारांचा युवा कार्यकर्ता. आम्ही त्याला भेटायला गेलो तेंव्हा जांभळ्या रंगाचा रेशमी कद नेसून तो देवळात पूजा करायला निघाला होता. "बसा, नारळाच्या दुधातले पोहे चाखून पहा. आय म्हाका फ्रेंड आयला गो.. पाहुणचार करां. मी येतोच. ताई बसा " असे म्हणत तो गेलाही. माझी उत्सुकता पार शिगेला पोचली.
 "... ताई, गेल्या कित्येक पिढ्यांपासून आमच्या घराण्यातल्या मोठ्या मुलाकडे या दुर्गेचे पुजारीपण आमच्या घरात चालत आले आहे. या आवारात रहायला साधेसे घर आहे. ते तुम्ही पहातच आहात. मी मोठा मुलगा म्हणून मजकडे आलेला हा व्यवसाय आणि जबाबदारी आहे. ती मी इमाने इतबारे करतोय. मी देवीकडे काय मागत नाय. देवी माझ्याकडे काय मागत नाय. माजा बापुस दहावी झाला होता. मी बी.ए. झालो. कॉलेजमध्ये असतांनाच युवक क्रान्ती दलात गेलो. मला तिथं कोनी सांगितलं नाय की

१२६ / रुणझुणत्या पाखरा